Tarun Bharat

कोयनेत भूकंपाचा सौम्य धक्का

वार्ताहर/ कोयनानगर

कोयना धरण परिसराला शुक्रवारी पहाटे भूकंपाच्या सौम्य धक्क्मयाने हादरवून टाकले. शुक्रवार 28 रोजी पहाटे सकाळी 6 वाजून 34 मिनिटांनी हा धक्का जाणवला. भूकंपमापन केंद्रांवर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल एवढी नोंदली गेल्याची माहिती कोयना भूकंप प्रशासनाने दिली. भूकंपाच्या केंद्रबिंदूचे अंतर कोयना धरणापासून 12 किलोमीटर अंतरावर हेळवाक गावच्या नैऋत्येस 5 किलोमीटर इतकी नोंद झाली आहे. दरम्यान, सध्या कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून या भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका झाला नसून धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आला.

Related Stories

शेतकरी संघटनेने रोखली ऊस वाहतूक

Patil_p

बाधित वाढ आटोक्यात आल्याने निर्बंध शिथिल होण्याची शक्यता

datta jadhav

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना : महिलांच्या खात्यांवर मे महिन्याचे पाचशे रुपये वर्ग

Archana Banage

ऊसतोड कामगारांची गावाकडे जाण्यासाठी घालमेल

Archana Banage

सातारा : कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी यांचे सुधारित आदेश जारी

Archana Banage

पालकमंत्र्यांनी पवारांचा विश्वास सार्थ ठरवला

Amit Kulkarni