Tarun Bharat

अष्टमी फेरीच्या व्यापाऱयांवर सौम्य लाठीहल्ला

Advertisements

उद्यापासून अष्टमी-चतुर्थी फेरी

प्रतिनिधी /पणजी

पणजीत उद्यापासून मांडवीच्या किनारी कांपाल परिसरात सुरू होणाऱया अष्टमीच्या फेरीवरून महापालिकेच्या समोर मंगळवारी धुमश्चक्री झाली. महापालिकसमोर अर्जासाठी उभ्या असलेल्या दुकानदारांवर पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला केला. पोलिसांनी त्यातील एका व्यक्तीला ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले.

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने वार्षिक पद्धतीने पणजीच्या मांडवी किनाऱयावर भरणाऱया अष्टमीच्या फेरीमध्ये सुमारे 250 स्टॉल उभारण्यास महापलिका परवानगी देते. यावर्षी मोठय़ा प्रमाणात व्यापारीवर्ग स्टॉल उभारण्यासाठी सज्ज झाले होते. महापालिका याकरीता काल मंगळवारी परवाना अर्ज देत होती. त्यासाठी अनेकजण पहाटे 6 वाजल्यापासून मनपाच्या दारात उभे होते. प्रत्यक्षात सकाळी 9.30 वा. नंतरच अर्ज देण्यास सुरुवात झाली. त्यासाठी प्रक्रिया देखील अत्यंत धिम्यागतीने जात होती. दुपारी अचानक अर्ज देणे बंद केल्यानंतर आजूबाजूला जमलेले सर्व व्यापारी एकत्रितपणे महापलिकेत जाण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडविले. त्यानंतर या व्यापारीवर्गाने थेट महापालिकेत प्रवेश करण्यासाठी एकच गर्दी केली आणि त्यातून पोलिसांबरोबर संघर्ष सुरू झाला.  त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य प्रमाणात लाठीहल्ला केला. या प्रकाराने अनेकजणांनी नाराजी व्यक्त केली.

फेरी 15 दिवस भरणार

वार्षिक अष्टमी-गणेशचतुर्थी फेरीला विक्रेत्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला असून ती फेरी 18 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर अशी एकूण 15 दिवस भरणार आहे.

 गेली 2 वर्षे कोरोना महामारीच्या संकटामुळे फेरी भरली नव्हती आता ते संकट कमी झाल्यामुळे फेरीला स्टॉल्स मिळविण्यासाठी विक्रेत्यांची झुंबड उडाली असून ग्राहकांचा देखील तसाच प्रतिसाद मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. पणजी मार्केट परिसरात मांडवी किनारी फेरी भरणार आहे. पणजी मनपा कार्यालयात अर्ज उपलब्ध करण्यात आले असून 2.70ƒ4 मीटर असा क्षेत्राचा स्टॉल देण्यात येणार आहे.

Related Stories

स्वयंपूर्ण मित्रांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

Patil_p

दिवाडीतील क्रीडापटूंना मदत करणार

Amit Kulkarni

ताळगांव येथे लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन

Omkar B

कुंभारजुवे मतदारसंघात बदलासाठी मला निवडावे

Amit Kulkarni

पोलिसांवर गोळीबार करुन कैद्याचे पलायन

Omkar B

दूध उत्पादकानांही मिळणार किसान क्रेडिट कार्डचा लाभ

Omkar B
error: Content is protected !!