वीज कर्मचारी उशीरा आल्याने आगीने घेतला पेट
प्रतिनिधी /म्हापसा
आंगण म्हापसा येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बाटा शोरुमच्या गोदामाला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत गोदामातील ब्रॅन्ड न्यू नवीन चप्पले जळून खाक झाली. या आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाले असले तरी म्हापसा अग्नीशामक दलाच्या जवानांनी आपल्याजिवावर खेळत हि आग विझविण्यास यश मिळवले आग लागल्यावर अग्निशामक दलाचे बंब त्वरित घटनास्थळी आले असले तरी येथे थेटवीजकन्शेक्शन असल्यानी वीज खात्याच्या कर्मचारी वर्गानी सुमारे 45 मिनिटे लावण्याने आगीने मोठा पेट घेतला असल्याची माहिती म्हापसा अग्निशमक दलाच्या अधिकारी वर्गांनी दिली.
असे असले तरी दलाच्या जवानांनी बरेच परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणली. गोदाम बंद असल्याने शर्टर फांडून पाण्याचे फवारे मारण्यात आले व हळू हळू आग आटोक्यात आणली. यावेळी बंबमध्ये पाण्याची कमतरता असल्याचे आढळून आल्याने येथे काहीवेळ गोंधळ माजला असला तरी उपस्थित सबअधिकारी ज्ञानेश्वरी सावंत व अधिकारी बॉस्को फेर्रावयांनी संपर्क साधून बंबमध्ये पाणी खूप असल्याचे स्पष्ट केल्याने उपस्थित जमाव थंड झाला.
आग लागल्याची माहिती मिळताच म्हापशातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली नगरसेजविका केअर ब्रागांझाही घटनास्थळी येवून त्यांनी पाहणी केली व घटनेची माहिती अग्नीशामक दलास दिली.
अग्नीशामक जवानांना पत्रकारांच्या लाईटचा आधार
दरम्यान या ठिकाणी आगविझविण्यासाठी आलेल्या जवानांकडे एकच टॉर्च असल्याचे आढळून आले तेही पुर्णतः चार्च नव्हता. त्यामुळे तो मधोमध बंद करुन जवान आग विझविण्याचे काम करीत होते. लाईटही योग्य नसल्याने काय करावे हे समजत नव्हते घटनास्थळी सर्वत्र अंधार पसरलेला होता. अखेर पत्रकारबंधू विडिओ शुटिंग करीत असताना त्यांचा आधार घेऊन जवानांनी ही आग विझविली. दरम्यान याबाबत उपस्थित अधिकारी ज्ञानेश्वर सावंत यांच्याशी विचारपूस केली असता ते म्हणाले यापूर्वी आम्ही अन्य कॉलसाठी गेलो होतो. तेथे दोन चार्जेबल टॉच होते व आमच्याकडे एक आहे. तोपूर्णतः चार्जनसल्याने आम्हाला आधार घ्यावा लागला. विशेष म्हणजे बार्देश तालुक्यातील एवढय़ा मोठय़ा दलात फक्त 3 टॉर्च आहे हे मात्र चर्चेची गोष्ट म्हणावी लागेल. अशा घटना घडल्या की वीजखात्याने त्वरित घटनास्थळी धाव घ्यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली.
सबअधिकारी ज्ञानेश्वर सावंत यांच्या नेतृत्वाखाली शहीद खान, भिकाजी कानोजी, अशोक वळवईकर, संजय फडते, हितेश परब, स्वप्नेश कलंगुटकर, आनंद बांदोडकर यांनी आग विझविण्यास बरेच परिश्रम घेतले.