प्रतिनिधी / बेळगाव :
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे रविवारी सकाळी मिनी मॅरथॉनचे आयोजन करण्यात आले होते. इन्फंट्रीतील लहान मुलांकरिता ही मॅरथॉन आयोजित करण्यात आली होती. स्टेशन कमांडर ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांनी मिनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखविला.
राष्ट्रीय एकता या ब्रिदवाक्याखाली मॅरथॉन आयोजित करण्यात आली होती. आझादी का अमृत महोत्सव साजरा होत असल्याने युवकांमध्ये देशभक्ती जागृत हावी या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. १३ ते १७ वयोगटातील मुला-मुलीच्या गटात स्पर्धा झाली ५ कि. मी. ची ही मिनी मॅरथॉन ठेवण्यात आली होती. विजेत्यांना इन्फैंट्रीतर्फे आकर्षक बक्षिसे देण्यात आली.