Tarun Bharat

जनतेला योग्य पध्दतीने व वेळेवर सेवा देण्यासाठी पंचायत राज व्यवथा महत्वाची – पालकमंत्री पाटील

सांगली/प्रतिनिधी

जनतेला योग्य पध्दतीने व वेळेवर सेवा देण्यासाठी स्थानिक स्तरावरचे अधिकार स्थानिकानांच देणे आवश्यक असून त्यादृष्टीने पंचायत राज व्यवथा महत्वाची असल्याचे सांगून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अधिकारांचे बळकटीकरण होण्याची गरजही पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रतिपादीत केली.

जिल्हा परिषद स्थापनेस 1 मे 2022 रोजी 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा परिषद सांगली येथे हिरक महोत्सव साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री जयंत पाटील बोलत होते. यावेळी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी सुहास बाबर, देवराज पाटील, अविनाश पाटील, मालन ‍ मोहिते, कांचन पाटील, प्रविण हेंद्रे, आशा पाटील, छाया पाटील, कमल पाटील,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजय बजाज, पदमाकर जगदाळे, दिनकरराव पाटील, बाळासाहेब होनमोरे यांच्यासह जिल्हा परिषदेचे आजी माजी सदस्य उपस्थित होते.

Related Stories

शिराळ्यात तेरा हजारांची ऑनलाईन फसवणूक

Archana Banage

ट्रीमिक्स रस्त्याचे काम सुरू होण्याआधीच संशयकल्लोळ

Archana Banage

सांगली : नवे ९९ रूग्ण तर १७६ कोरोनामुक्त

Archana Banage

Sangli; म्हैसाळ आत्महत्या प्रकरणी आणखी तिघांना अटक

Abhijeet Khandekar

Sangli; रेल्वे क्रॉसिंगचे प्रलंबित प्रस्ताव तातडीने मंजूर करणार : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव

Abhijeet Khandekar

आटपाडीत तलाठय़ासह दोघांना अटक

Patil_p