Tarun Bharat

प्रतापगडावरील ‘त्या’ वक्तव्यावर मंत्री लोढांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले…

ऑनलाईन टीम/तरुण भारत

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून पेटलेला वाद अजून शमलेला नसताना भाजप नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या नव्या वादग्रस्त वक्तव्यानं राजकीय वादंग पेटलं आहे. दरम्यान, शिवतप्रताप दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह काही मंत्री प्रतापगडावर गेले आहेत. यावेळी भाषणादरम्यान, मंत्री लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यानं नवा वाद पेटलाय. तर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

शिवतप्रताप दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही मंत्री प्रतापगडावर गेले होते. या ठिकाणी विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आलेले होते. दरम्यान, या ठिकाणी भाषण करताना भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या एका विधानाने आता आणखी एक नवा वाद उफाळण्याचे चिन्हं दिसत आहेत. राज्यपाल कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते त्रिवेदींनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आता मंगलप्रभात लोढांचं वक्तव्य समोर आलं आहे. यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार, आदित्य ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांकडून लोढांवर टीका करण्यात आली आहे. या पार्श्वबूमीवर मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकारपरिषद घेत आपली बाजू मांडली आहे.

मंगलप्रभात लोढा म्हणाले, “विरोधक काय बोलतील, त्यांचा तो अधिकार आहे. पण जे काही झालं नाही, जे टीव्ही किंवा सोशल मीडियावर सुरू आहे. जे राष्ट्रवादीचे नेते बोलत आहेत, मी काय सांगितलं हे त्यांनी बघितलं असेल का? त्यांनी नाही बघितलं. मी फक्त उदाहरण दिलं होतं. कधीही तुलना केली नाही करू शकत नाही. कोणीही करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज सूर्य आहे. आम्ही सर्व इथे आहोत. मग त्यांची तुलना करण्याचा मूर्खपणा कोणी कसा करेल, मी तर कधीच नाही करणार.

Related Stories

किणी टोल नाक्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाचे पोलीस प्रमुखांनी केले कौतुक

Archana Banage

अमेरिकेत 24 तासात 70 हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

उद्धव ठाकरे आयत्या बिळावर नागोबा – नारायण राणे

Archana Banage

Satara; सह्याद्री व्याघ्र प्रकल्पास हिंदूहृदसम्राटांचे नाव न दिल्याची खंत- मंत्री शंभूराज देसाई

Abhijeet Khandekar

भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केले प्लाझ्मा दान

Tousif Mujawar

मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला हलवणे हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश – सचिन सावंत

Archana Banage