ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी एखाद्या घोषणेची मडगाव पालिकेला आशा, आग दुर्घटनेचे पडसाद उमटण्याची शक्यता
प्रतिनिधी /मडगाव
सोनसडा कचरा यार्डमध्ये शुक्रवारी लागलेली आग सर्वत्र पसरण्यापूर्वी अग्निशामक दलाने वेळेत त्यावर काबू मिळविला. आता कचरा व्यवस्थापनमंत्री बाबूश मोन्सेरात आणि नगरविकासमंत्री विश्वजित राणे मंगळवारी सोनसडय़ाला भेट देणार असून सोनसडय़ाचा ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी ते एखादी घोषणा करतील, अशी आशा मडगाव पालिका बाळगून आहे. शुक्रवारी लागलेल्या आगीचे पडसाद यावेळी उमटणार आहेत.
दैनंदिन निर्माण होणाऱया 35 टन ओल्या कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा व्यावसायिक राजधानीत अजूनही नसल्याने समस्यांचा सामना करावा लागत आहे. मडगावातील कचरा हाताळणे तसेच त्याची प्रक्रियेनुसार विल्हेवाट लावणे स्थानिक नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात येते. मंत्री मोन्सेरात आणि मंत्री राणे यांच्या भेटीवेळी साळगावप्रमाणे कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सोनसडा येथे प्रशस्त कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने सरकारकडून हस्तक्षेप करून एखादी घोषणा केली जाईल, अशी अपेक्षा मडगाव पालिका बाळगून आहे. खरे तर नगरसेवकांपासून पालिका अधिकाऱयांपर्यंत सारे ही अपेक्षा करत आहेत.
काही दिवसांपूर्वी सोनसडा कचरा यार्डमधील मुख्य इमारतीची शेड कोसळल्याने शेडमध्ये पडून असलेला 14 हजार टन कचरा बाहेर काढण्यासाठी गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने सुमारे 3 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च सध्या तयार केला आहे. सदर निधीची तरतूद होण्यासाठी सरकारी मान्यता देण्यात यावी अशी मागणी यावेळी उभय मंत्र्यांकडे केली जाण्याची शक्मयता आहे. सोनसडय़ावर दैनंदिन कचरा हाताळणे अडचणीचे बनले आहे. कचऱयाचे ढीग लागू लागले असून त्यातच आधी पडून असलेला कचरा हटविण्यासाठी आवश्यक कृती होत नसल्याचे दिसून येत आहे. पुढे पालिका क्षेत्रातील कचरा उचलणे हा एक प्रश्न बनण्याची शक्मयता आहे. त्यामुळे लवकरात लवकर शेडमधील कचरा हटवून त्यावर बायोरेमेडिएशन करण्याची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे. 2020 च्या मध्यास घनकचरा महामंडळाकडून अशा प्रकारे कचऱयाचे ढीग बाहेर काढण्यात आले होते. त्यावर 84 लाख रु. खर्च आला होता. पालिकेचे अधिकारी शहरातील दैनंदिन कचरा काकोडा येथे न्यावा, अशी शिफारस करताना दिसत आहेत. उभय मंत्र्यांनी भेटी दिल्यानंतर सरकारचे सोनसडय़ाबाबत काय धोरण आहे ते स्पष्ट होणार आहे.