ऑनलाईन टीम/तरुण भारत
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अप्लसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) मनी लाँड्रिंग (money laundering) प्रकरणात ईडीच्या (ED) अटकेत आहेत. अचानक त्यांच्या पोटात दुखू लागल्याने मलिक यांना मुंबईतील जेजे रुग्णालयातील (J J Hospital) अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. सोमवारी सकाळी रक्तदाब कमी झाल्यानं आणि पोटाच्या समस्येमुळं मलिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जेजे रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. तर, सध्या नवाब मलिक आयसीयूमध्ये दाखल असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी मुंबईतील विशेष न्यायालयाला दिली आहे. (Nawab Malik admitted to JJ Hospital)
गेल्या आठवड्यात आर्थर रोड कारागृहात कैदेत असलेले 62 वर्षीय मंत्री नवाब मलिक यांनी खासदार आणि आमदारांविरुद्धच्या फौजदारी खटल्यांच्या सुनावणीसाठी स्थापन केलेल्या विशेष न्यायालयात वैद्यकीय आधारावर अंतरिम जामीन मागितला होता. मंत्र कोर्टाने त्यांना जमीन देण्यास नकार दिला होता. तसेच ईडीनं ही यावेळी मालिकांना अंतरिम जामीन अर्जाला विरोध करत मलिकांनी मागितलेला वैद्यकीय जामीन म्हणजे, कायद्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला होता.