कोल्हापूर– राज्यात भूकंप घडवणारी चाल मंत्री एकनाथ शिंदे यांनी खेळून शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. दोन अपक्षासह ३५ सेनेचे आमदार घेऊन बंड पुकारले आहे. भाजपसोबत सत्ता स्थापन करा आम्ही हिंदुत्वाच्या नाऱ्यायावर पुढे जात आहोत. अशी भूमिका घेत महाविकासआघाडीतून सेनेने बाहेर पडावे. अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे आज मध्यरात्री एकनाथ शिंदे यांनी सुरत मधील हॉटेल मधून निघण्यापूर्वी ३५ आमदारांना घेऊन फोटो व्हायरल केले होते. त्यामुळे प्रचंड दबाव शिवसेनेवर आला आहे.
एकनाथ शिंदे यांच्यावर प्रहार संघटनेचे कृषी राज्यमंत्री बच्चू कडू हे देखील आहेत. तर दुसरे अपक्ष उमेदवार कोल्हापुरचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आहेत की काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी व्हायरल केलेल्या फोटोमध्ये आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे बंधू दिसून येत आहेत. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे बंधू आणि जयसिंगपूर चे उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर बंडखोर अपक्ष आमदारांच्या टीमसोबत असलेला फोटो देखील पहायला मिळत आहे. सध्या राजेंद्र पाटील-यड्रावकर हे मुंबईत असले तरी त्यांचे बंधू मात्र एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दावा केलेल्या आणखी दहा आमदारांमध्ये यड्रावकर यांचा समावेश आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव आल्याशिवाय कोणतेही भाष्य नाही- नाना पटोले