Tarun Bharat

मंत्री राणे सूडाने आपला धंदा बंद पाडू पाहतात

Advertisements

विरोधी पक्षनेते लोबो यांचा आरोप : रेस्टॉरंट्सना पाठविल्या नोटिसा

प्रतिनिधी /पणजी

नगर आणि नियोजनमंत्री विश्वजित राणे हे आपल्या पदाचा गैरवापर करुन आपला धंदा बंद करण्यासाठी आपल्या हॉटेलांतील 5 रेस्टॉरेंट्सना अन्न आणि औषध संचालनालयातर्फे नोटीसा पाठवित आहेत. शिवाय नगरनियोजन खात्यातर्फे देखील आपल्याला नोटीस पाठवित असल्याचा सनसनाटी आरोप विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी केला आहे.

पत्रकारांशी बोलताना त्यांनी मंत्री विश्वजित राणे यांच्यावर सडकून टीका केली. आपल्यावर मंत्री राणे हे आकसापोटी सूड भावनेने वागत तर आहेच शिवाय आपल्या धंद्यावर ते तुटून पडत आहेत. आपले हॉटेलचे सर्व धंदे बंद पडावेत यासाठी आपल्या 5 रेस्टॉरंटस्मध्ये अन्न आणि औषध संचालनालयाच्या अधिकाऱयांनी जाऊन तिथे रेस्टॉरंटमध्ये जाणाऱया नागरिकांचा मार्ग अडविला. आणखी आपली 7 रेस्टॉरंटस् आहेत ती देखील बंद करण्याचा मंत्री विश्वजित राणे यांचा इरादा मायकल लोबो यांनी बोलवून दाखविला.

आमचा धंदा अचानकपणे बेकायदा कसा : डिलायला लोबो

मुख्यमंत्री आणि विश्वजित राणे यांच्या संघर्षात आमच्या सारख्यांचा अकारण बळी दिला जात आहे. मंत्री विश्वजित राणे हे पूर्णतः वैयक्तिक पातळीवर जात आहे. आपण विरोधी पक्षात असल्याने सरकारी कर्मचाऱयांचा वापर करुन आमचा छळ त्यांनी चालविला आहे असेही निवेदन मायकल लोबो यांनी केले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या आमदार डिलायला यांनी सांगितले की, आमचा हॉटेल व्यवसाय हा तब्बल 25 वर्षे चालू आहे व तो अचानक बेकायदेशीर कसा ठरतो?

दरम्यान, विरोधी पक्षनेते मायकल लोबो आणि आमदार डिलायला लोबो यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांना सदर घटनेची सविस्तर माहिती दिली.

Related Stories

ब्रह्मेशानंदाचार्यांना पद्मश्री प्रदान

Amit Kulkarni

मालपे पेडणे येथे ट्रकला आपघात सुदैवाने चालक बचावला

Omkar B

दि ललित रिसॉर्टमधील स्थानिक कामगारांना न्याय द्या

Amit Kulkarni

दावकोण पूरग्रस्त भागात द. गोवा जिल्हाधिकाऱयाची पाहणी

Patil_p

चॅम्पियन्स चेस अकादमीतर्फे विविध ऑनलाईन स्पर्धा

Amit Kulkarni

ताळगांव नाल्याच्या साफसफाई दरम्यान अपरीहार्य समस्या

Omkar B
error: Content is protected !!