प्रतिनिधी /गुंजी
येथील श्री माउलीदेवी मंदिर लोकार्पण सोहळय़ानिमित्त मंगळवारी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर जीर्णोद्धार कमिटीच्यावतीने येथील सामाजिक कार्यकर्ते दीपकराव देसाई यांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि माउलीदेवीची प्रतिमा देऊन सत्कार केला. यावेळी बोलताना त्यांनी मंदिराच्या शिल्पकलेचे आणि सभोवतालच्या निसर्गसौंदर्याचे कौतुक केले. तसेच गोवा आणि गुंजी माउलीदेवीचा जवळचा संबंध असल्याचे सांगून या देवीवर आपली श्रद्धा असल्याचे सांगितले. खानापूर तालुक्मयातील जनतेचे वेळोवेळी प्रेम आणि आशीर्वाद लाभल्याने आपुलकीचे नाते जपल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी वासुदेव चौगुले, निखिल सोज, सातेरी घाडी व भाविक उपस्थित होते.