पणजी : उत्तर गोवा खासदार आणि केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी नवी दिल्लीत लोकसभेत झालेल्या संसद सदस्यत्वाच्या शपथग्रहणाच्यावेळी संस्कृत भाषेतून शपथ घेतली. दक्षिण गोवा मतदारसंघातून प्रथमच विजयी झालेल्या विरियातो फर्नांडिस यांनी मात्र कोकणी भाषेतून शपथ घेतली. नाईक हे भाजप उमेदवारीवर सलग सहा वेळा उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले असून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांचा पराभव केला आहे. दक्षिण गोव्यात भाजपच्या प्रथमच निवडणूक लढवणाऱ्या पल्लवी धेंपे यांना काँग्रेस उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी पराभूत केले होते.
Previous Articleखासदार विरियातो फर्नांडिस यांनी घेतली कोकणीतून शपथ
Next Article घंटी वाजली आता विकासाचा घंटानाद होऊ दे..!
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.