Tarun Bharat

‘वंदे मातरम्’ आदेशावरून मुनगंटीवारांचा यूटर्न

ऑनलाईन टीम/तरुण भारत

सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फोनवरून संवाद साधताना हॅलोऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणायचं, अशा आशयाचं वक्तव्य भाजपा नेते आणि वन, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर अनेक राजकीय नेत्यांनी याला विरोध केला होता. तर मुनगंटीवारांनी विरोधानंतर याविधानावर घुमजाव करत स्पष्टीकरण दिल आहे. आपण हॅलोऐवजी केवळ ‘वंदे मातरम्’ (Vande Mataram) हाच शब्द वापरा, असं म्हटलं नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे.

दरम्यान, हॅलोऐवजी केवळ ‘वंदे मातरम्’ हाच शब्द वापरा असं सुधीर मुनगंटीवारांनी वक्तव्य केलं होतं. यांनतर अनेकांनी यावर टीका केली. रझा अकादमीने सुद्धा याला विरोध केला आहे. यावर मुनग्नतेवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. “रझा अकादमीला विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. इंग्रजांनी किंवा विदेशातून आलेल्या ‘हॅलो’ शब्दाऐवजी ‘वंदे मातरम्’ शब्द वापरावा, हे अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आमच्या विभागाचं सुरू केलेलं अभियान आहे. एखादा व्यक्ती ‘वंदे मातरम्’च्या तोडीचा शब्द वापरत असेल किंवा राष्ट्रभक्ती, देशभक्ती व्यक्त करणारा शब्द वापरत असेल, तर त्याला आमचा विरोध असण्याचं काहीच कारण नाही.”

“भारत माता की जय’ किंवा ‘वंदे मातरम् म्हणायचं की नाही? हे रझा अकादमीने ठरवावं. पण महाराष्ट्राच्या साडे तेरा कोटी लोकांपैकी बहुसंख्य लोकं हॅलो या शब्दाला पर्यायी शब्द ‘वंदे मातरम्’ वापरत असतील तर रझा अकादमीला कोणता शब्द वापरायचा आहे? हे त्यांनी ठरवावं” असंही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

Related Stories

मिरजेत आमदार पडळकरांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक

Archana Banage

बलात्काराची धमकी देत चोरी

Patil_p

जिल्हय़ात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढली

Patil_p

कृष्णा घाटावर यशवंत महोत्सवास प्रारंभ

Patil_p

संभाजीराजेंनी घेतली संजय राऊत यांची भेट

datta jadhav

अयोध्येतील राम मंदीराचा प्रस्तावित आराखडा सादर

datta jadhav