Tarun Bharat

“दादरमध्ये उभारण्यात येणारं प्रति सेनाभवन नाही, तर…” उदय सामंतांचे ट्विट करत स्पष्टीकरण

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

दादरमध्ये (Dadar) शिंदे गटाकडून प्रति सेनाभवन उभारण्यात येणारं आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी शुक्रवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली होती. यांनतर शिंदे गटावर टीका होत होती. आत याबाबत याबाबत मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ट्वीट केले आहे. प्रति शिवसेना भवन नाही तर, जनसंपर्कासाठी कार्यालय बांधत असल्याचे स्पष्टीकरण सामंतांनी दिले आहे.

“प्रति सेनाभवन नव्हे तर जनसंपर्कासाठी कार्यालय बांधतोय, शिवसेना भवनाबद्दल (Shivsena Bhavan) आदर कायम आहे”, असं उदय सामंत म्हणाले आहेत. “मुंबई दादर येथे प्रति शिवसेना भवन मा. एकनाथजी शिंदे करत आहेत, हा गैरसमज पसरवला जात आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांना सर्वसामान्य जनतेला भेटता याव ह्यासाठी मध्यवर्ती कार्यालय असावे आमचा प्रयत्न आहे. शिवसेना भवनबद्दल आम्हाला कालही आदर होता उद्याही राहील”, असं ट्विट उदय सामंत यांनी केलं आहे.

दादरमध्ये शिंदे गटाकडून प्रती सेनाभवन उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार सदा सरवणकर यांनी दिली. यासाठी दादरमध्ये जागेचा शोधही घेण्यात येत आहे. दादरमध्ये शिंदे गटाचे मुख्य कार्यालय उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: या कार्यालयातून जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत. मुंबईतील प्रत्येक प्रभागामध्ये या प्रतिसेना भवनाचे कार्यालय असेल. येत्या १५ दिवसांमध्ये या कार्यालयाचे उद्धाटन करण्यात येणार असून मुंबई शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आले असल्याचे सरवणकर म्हणाले.

error: Content is protected !!