Tarun Bharat

मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द …तरीही कर्नाटक प्रशासनाकडून खबरदारी !

कोगनोळी जवळ मोठा पोलीस फौजफाटा

कागल / प्रतिनिधी

सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांतदादा पाटील व शंभूराज देसाई यांचा आज होणारा बेळगाव दौरा रद्द झाला असला, तरी कर्नाटक सरकारने खबरदारी घेतली असल्‍याचे दिसून येत आहे. कर्नाटकच्या पोलिसांकडून कर्नाटक-महाराष्ट्रच्या कोगनोळी सीमेवर खबरदारी घेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून चौकशी सुरू ठेवली आहे. महाराष्‍ट्राच्या मंत्र्यांना कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकात प्रवेश द्यावयाचा नाहीच, यावर कर्नाटक सरकार ठाम आहे. याचाच एक भाग म्हणून खबरदारी घेत सीमाभागातील तपासणी नाक्यांवर खडा पहारा ठेवला आहे.

दरम्यान, यातूनच जर मंत्री बेळगावला येणार असतील तर, कोणत्याही परिस्थितीत कोगनोळी सीमेवर कर्नाटक हद्दीत महामार्ग रोखण्याची तयारीही पोलीस प्रशासनाने केली आहे. सीमाप्रश्न ही न्यायप्रविष्ट बाब आहे. असे असले तरी सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराजे देसाई यांचा आजचा बेळगाव दौरा निश्चित होता, मात्र सीमा भागात तणावपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे मंत्र्यांचा दौरा रद्द झाला आहे.

Related Stories

बेंगळूर: सीसीबीने चार ड्रग पेंडलरांना केली अटक, १ कोटी रुपयांचे ड्रग जप्त

Archana Banage

‘लैला’ कडून उसाचा पहिला हप्ता 2600 रु. शेतकऱयांच्या खात्यावर जमा

Amit Kulkarni

भारतातील अफगाण दूतावासाचे ट्विटर अकाउंट हॅक

datta jadhav

गेल्या आठ वर्षात नरेंद्र मोदींनी केवळ दोन व्यक्तींनाच मोठं केलं; राहुल गांधींचा घणाघात

Archana Banage

सभासदांना लाभांश, ठेव वाटप करण्यास परवानगी द्या

Archana Banage

सांगलीत नव्या दहा कोरोना रुग्णांची भर

Archana Banage