Tarun Bharat

आंबा बागायतदारांच्या प्रश्नासंबंधी 8 दिवसात मंत्रालयात बैठक

Advertisements

प्रतिनिधी/ रत्नागिरी

आंबा बागायतदार यांचे मागील 2 वर्षात अतोनात नुकसान झाले. त्यांचे प्रश्न महत्वपूर्ण असून ते सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 8 दिवसात मंत्रालय स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी येथे दिली. 

  मागील अडीच वर्षात आंबा बागायतदार यांच्यावर अस्मानी संकट कोसळले आह़े वादळ, अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल, यामुळे बागायतदार उद्धस्त होवून कर्जबाजारी झाला आह़े यावर बँका व वित्तीय संस्था बागायतदारांची पिळवणूक करत असल्याचा आरोप गुरूवारी आंबा बागायतदार यांच्याकडून पत्रकार परिषदेत करण्यात आला होत़ा तसेच 9 ऑगस्ट रोजी आठवडा बाजार येथे मेळाव्याचे आयोजन आंबा बागायतदार यांच्याकडून करण्यात आल़े

  याची रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी तातडीने दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल़ी मागील अडीच वर्ष आंबा बागायतदार यांच्यासाठी मंत्रालयात सकारात्मक बैठक कदाचित होऊ शकली नाही. आंबा बागायतदार यांचे प्रश्न महत्वपूर्ण असून या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. कोकणातील आंबा बागायतदार यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पुढील आठवडय़ात बैठक घेऊ, असे मुख्यमंत्री महोदयांनी आश्वस्त केल्याचे सामंत यांनी सांगितल़े

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले युती सरकार हे सर्वसामान्य नागरिकांचे सरकार आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत-जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी युती सरकार कटिबद्ध आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तत्काळ सोडवणे, हा युती सरकारचा प्राधान्यक्रम आहे, असे यावेळी सामंत म्हणाले. सामंत म्हणाले, पुढील आठवडय़ात होणाऱया बैठकीत आंबा बागायतदार यांचे प्रश्न सकारात्मकपणे सोडवले जातील, असा मला विश्वास आहे. युती सरकार हे समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले आपलं सरकार आहे, असे उदय सामंत यांनी सांगितल़े

Related Stories

चिपळुणात ‘क्वारंटाईन’ना ‘क्रीडाई’तर्फे अन्नदान

Patil_p

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांच्या हजेरीत उत्तर रत्नागिरी सपशेल नापास!

Patil_p

आरोग्य तपासणीच्या रागातून पोलीस पाटलाला धक्काबुक्की

Patil_p

गणेशचतुर्थीच्या तोंडावर वीज कनेक्शन तोडणी नको

NIKHIL_N

138 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत

NIKHIL_N

घरेलू कामगारांच्या खात्यावर आर्थिक मदत जमा

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!