Tarun Bharat

मत्स्यखात्याकडून वायंगणी समुद्रात मिनी पर्सनेट नौकेस घेतले ताब्यात

Ministry of Fisheries seized mini personal yachts in Wayangani sea

नौकेचा मासेमारी पास नसल्याने कारवाई

वायंगणी किनाऱयासमोरील समुद्रात मिनी पर्सनेटद्वारे मासेमारी करण्यास आलेल्या हसिना (`काकांची कृपा’) या नौकेकडे मासेमारीचा परवाना नसल्याने शितल गस्ती नौकेवरील बेकायदा मासेमारी करणाऱ्या पथकाने काल सायंकाळी पकडले आहे. या नौकेवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमाचे कलम 7 अन्वये कारवाईसाठी गुरूवारी अभिनिर्णय अधिकारी तथा मालवण येथील सिंधुदुर्गचे सहाय्यक मत्य आयुक्त यांचेकडे हे प्रकरण सादर केल्याची माहिती वेंगुर्लेचे परवाना अधिकारी तथा अंमलबजावणी अधिकारी चिन्मय जोशी यांनी दिली.


काल बुधवारी वेंगुर्ले कन्हैया शंकर गावडे यांची हसिना (काकांची कृपा) या नावाची नौका खवणे समुद्र किनाऱ्या समोरील 5 ते 6 वांव पाण्यात मिनी पर्सनेट लावून मासे पकडत होती. वेंगुर्ले बंदरातून आपल्या दिशेने मत्स्यखात्याची गस्तीनौका येत असल्याचे पाहून या नौकेवरील खलाशी व तांडेल यांनी मासेमारीस टाकलेले जाळे भराभर नौकेत ओढून घेऊन ती वेंगुर्ले बंदराच्या दिशेने येत होती. या नौकेजवळ मत्स्यखात्याच्या गस्तीनौकेने जात त्या नौकेच्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यावेळी मासेमारी परवाना नसल्याचे दिसून आले. त्यानुसार सदर नौकेवर कारवाईसाठी ताब्यात घेत वेंगुर्ले मांडवीखाडी येथील नवाबाग जेटी येथे सदर मिनी पर्सनेट नौकस अवरूध्द करण्यात आले आहे.

वेंगुर्ले (वार्ताहर)-

Related Stories

खून प्रकरणातील दुसऱया आरोपीसही पोलीस कोठडी

Patil_p

जिह्यात कोरोनापासून बरे होण्याचे प्रमाण वाढले

Patil_p

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुळसचा जैतीर उत्सव साध्या पद्धतीने

Anuja Kudatarkar

आंबा, काजू, मच्छी निर्यात वृध्दीसाठी ‘ऍक्शन प्लॅन’

Patil_p

तीन दिवस वादळी पावसाचा इशारा

Patil_p

”गोल्डन पॉईंट”सिंधुदुर्गवर परप्रांतीयांचा डल्ला

Anuja Kudatarkar