Tarun Bharat

जलशक्ती मंत्रालयाचे ट्विटर हँडल हॅक

नऊ दिवसांत दुसरा मोठा सायबर हल्ला

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे ट्विटर हँडल गुरुवारी सकाळी हॅक झाले. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा आणि सायबर तज्ञ तपासात गुंतले आहेत. दुपारनंतर खाते रिस्टोअर करण्यात आले असले तरी वारंवार होणाऱया या सायबर हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या आठवडय़ात दिल्ली एम्समधील सर्व्हर हॅक झाल्यानंतर सरकारी साईटवर झालेला हा दुसरा मोठा सायबर हल्ला आहे.

जलशक्ती मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवरून पहाटे 5ः38 वाजता क्रिप्टो वॉलेटचा प्रचार करणारे ट्विट पोस्ट करण्यात आले. यावेळी खात्याच्या प्रोफाईल फोटो आणि लोगोमध्येही बदल करण्यात आल्याचे दिसून आले. मात्र, काही वेळाने अकाऊंट रिस्टोअर करून सर्व ट्विट डिलीट करण्यात आले. सुरक्षा एजन्सी आणि सायबर तज्ञ या घटनेचा तपास करत आहेत.

गेल्या नऊ दिवसांपूर्वी 23 नोव्हेंबर रोजी दिल्ली एम्सच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाला होता. यादरम्यान, हॅकर्सनी क्रिप्टो करन्सीमध्ये 200 कोटी रुपयांची मागणी केली. मात्र दिल्ली पोलिसांनी खंडणीचा इन्कार केला आहे. यानंतर खंडणी व सायबर दहशतवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी इंडिया कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, दिल्ली पोलीस आणि गृह मंत्रालय या घटनेची चौकशी करत आहेत. तथापि, हॅकिंगचा मुख्य स्त्रोत अद्याप समजू शकलेला नाही.

देशात महिन्याला 3 लाख सायबर हल्ल

गेल्या काही दिवसात भारतात. सायबर हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. भारतातील आरोग्य-सेवा क्षेत्रावर दर महिन्याला सुमारे 3 लाख सायबर हल्ले होतात. हे जगातील दुसऱया क्रमांकाचे सायबर हल्ले आहेत. अमेरिकन आरोग्य क्षेत्रावर दर महिन्याला सर्वाधिक सुमारे पाच लाख सायबर हल्ले होतात.

Related Stories

झारखंड : चाईबासामध्ये नक्षलवाद्यांनी रेल्वे ट्रॅक उडवला

Tousif Mujawar

शाळासंदर्भात राज्यांनीच निर्णय घ्यावा

Patil_p

भारत बायोटेकला धक्का ! WHO ने लसीचा आंतरराष्ट्रीय पुरवठा थांबवला

Archana Banage

अरबी समुद्रात न्यून दाबाचे क्षेत्र

datta jadhav

इरफान खानच्या निधनाने चित्रपट, नाट्यसृष्टीचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

Tousif Mujawar

काश्मीरी फुटीरवादी पक्ष स्थापन करणार

Patil_p