Tarun Bharat

पुण्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; 6 जणांना अटक

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

Minor girl gang-raped in Pune; 6 people arrested पुण्यात 15 वर्षीय मुलीचं अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून चतुश्रृंगी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

जय राजू तिंबोळे, ओम राजू तिंबोळे, सुनील जाधव, अनिल जाधव, किरण जावळे आणि शुभम जावळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकार जुलै ते 23 डिसेंबर 2022 यादरम्यान घडला. आरोपी अनिल जाधव याने चाकूचा धाक दाखवून पीडितेचं अपहरण केलं. त्यानंतर एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडितेचे नग्न फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला वेळोवेळी त्याच्या मित्रांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले. विशालनगर येथील लॉजवर, बाणेर येथील तुकाई मंदिर टेकडी तसेच औध येथील कबुतराच्या रुममध्ये 23 डिसेंबरपर्यंत हा प्रकार घडला. अखेर पीडितेचा संयम सुटला आणि तिने याप्रकरणाची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली. कुटुंबियांनी पीडितेला घेऊन तातडीने पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत 6 आरोपींना अटक केली आहे. पोक्सोसह अनुसुचित जाती जमाती अधिनियमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चतुश्रृंगी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

अधिक वाचा : शुक्लांच्या अडचणी वाढल्या; फोन टॅपिंग प्रकरणी नव्या चौकशीचे कोर्टाचे आदेश

Related Stories

खोळंबलेली विकासकामे तातडीने सुरू करा; भाजपच्या शिष्टमंडळाची आयुक्तांकडे मागणी

Tousif Mujawar

महापालिकेच्या उपायुक्तांकडे सापडले एक कोटींचे घबाड

datta jadhav

कोल्हापुर ते मुझफ्फरपुर साप्ताहिक किसान रेल धावणार

Archana Banage

सोलापुरात आज 28 कोरोनाग्रस्तांची भर, 6 जणांचा मृत्यू

Archana Banage

महाराष्ट्र : राज्यात ‘पेडियाट्रिक टास्क फोर्स’ची तातडीने निर्मिती

Archana Banage

कुंडल येथे घर फोडले; चोरट्यांचा तीन लाखाच्या दागिण्यांवर डल्ला

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!