Tarun Bharat

एपीएमसीत कांदा दरात किरकोळ वाढ

Advertisements

बटाटय़ासह भाजीपाला दर स्थिर

वार्ताहर /अगसगे

बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांद्याचा भाव प्रती क्विंटल दोनशे रुपयांनी वाढला. बटाटा दर मात्र स्थिर आहे. भाजी मार्केटमध्ये काही भाज्यांचे दर स्थिर आहेत. काहींचे दर कमी झाले आहेत. गेल्या शनिवारी कांद्याची आवक कमी झाल्याने भाव क्विंटलला दोनशे रुपयांनी वाढला होता. बुधवारच्या बाजारात आवक वाढली होती. त्यामानाने खरेदीदार कमी आल्याने कांद्याच्या भावात क्विंटलला दोनशे रुपयांची घसरण झाली होती. मात्र, पुन्हा शनिवारी बाजारात आवक कमी झाल्याने कांद्याचा भाव क्विंटलला दोनशे रुपयांनी वाढला आहे.

बेळगाव तालुक्यातील जवारी बटाटा संपला आहे. इंदूर, आग्रा आदी ठिकाणांहून बेळगावला बटाटा विक्रीसाठी येत आहे. इंदूर बटाटय़ाला हॉटेल, किरकोळ विक्रेते, वेफर्स बनविण्यासाठी मागणी येत आहे. सध्या शितगृहामधील बटाटे विक्रीसाठी येत आहेत.

बेळगावमध्ये दोन भाजीमार्केट झाली आहेत. जय किसान भाजी मार्केटला मोठय़ा प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी जात आहे. ए.पी.एम.सी. भाजी मार्केटला कमी भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. खरेदीदार विस्कटल्याने दोन्ही भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्यांचे दर वाढवून शेतकऱयांना आपल्याकडे खेचण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. यामुळे भाजीपाल्याचे दर टिकून आहेत. सध्या मिरची इतर बाजारपेठांमध्ये लोडींग करण्यात येत आहे, अशी माहिती भाजी व्यापाऱयांनी दिली.

भाजीपाला प्रती दहा किलो

 • ढबू मिरची…….. 350 ते 370 रु.
 • इंदस ढबू मिरची.. 250 ते 300 रु.
 • बिन्स………….. 600 ते 700 रु.
 • कारली………… 120 ते 180 रु.
 • वांगी………….. 150 ते 180 रु.
 • काटे वांगी……… 180 ते 200 रु.
 • दोडकी…………. 220 ते 250 रु.
 • कोबी………….. 200 ते 220 रु.
 • इंग्लिश गाजर….. 400 ते 450 रु.
 • भेंडी…………… 200 ते 220 रु.
 • बिट……………. 300 ते 320 रु.
 • जवारी काकडी…. 200 ते 250 रु.
 • पांढरी काकडी…. 130 ते 150 रु.
 • आले…………… 380 ते 400 रु.
 • जी-फोर मिरची… 550 ते 600 रु.
 • हिरवी मिरची…. 300 ते 350 रु.
 • काळी मिरची….. 250 ते 300 रु.
 • पांढरी मिरची….. 250 ते 280 रु.
 • हिरवी तुकडा मिरची 180 ते 250 रु.
 • बटका मिरची….. 400 ते 450 रु.
 • बटका तुकडा मिरची 280 ते 350 रु.
 • दुधी भोपळा प्रती डझन 200 ते 220 रु.
 • गोल भोपळा प्रती क्विं.1200 ते 1400रु.
 • टोमॅटो प्रती ट्रे         900 ते 1100 रु.

महाराष्ट्र कांदाभाव प्रती क्विंटल

 • गोळी………… 800 ते 1000 रु.
 • मीडियम……. 1100 ते 1600 रु.
 • मोठवड…….. 1600 ते 1900 रु.
 • गोळा………. 1900 ते 2100 रु.

कर्नाटक कांदा प्रती क्विंटल

 • गोळी………….. 600 ते 800 रु.
 • मीडियम……… 800 ते 1200 रु.
 • मोठवड…….. 1200 ते 1500 रु.
 • गोळा………. 1500 ते 1800 रु.
 • इंदूर बटाटा…. 2000 ते 2200 रु.

भाजीपाला शेकडा भाव

 • बेळगाव मेथी.. 1000 ते 1100 रु.
 • घटप्रभा मेथी.. 1200 ते 1400 रु.
 • शेपू ……………. 600 ते 700 रु.
 • पालक…………. 250 ते 300 रु.
 • कांदापात………. 400 ते 500 रु.
 • घटप्रभा कोथिंबिर 1300 ते 1500 रु.
 • बेळगाव कोथिंबिर 800 ते 1000 रु.
 • चायना कोथिंबिर. 600 ते 800 रु.
 • लाल भाजी…….. 400 ते 500 रु.

Related Stories

राज्य शासनाने कृषी कायदे रद्द करावेत

Amit Kulkarni

गौंडवाड येथे गणेश मंदिराचा उद्घाटन सोहळा साधेपणाने

Amit Kulkarni

शाहूनगर-कंग्राळी बुद्रुकपर्यंत गटारींची स्वच्छता तातडीने करा

Amit Kulkarni

सुरळीत पाणीपुरवठय़ासाठी अजून दोन दिवस लागणार

Patil_p

खानापूर स्टेशन रोडवरील अनधिकृत खोकी हटविली

Amit Kulkarni

ढगाळ वातावरणामुळे वीट उत्पादक-मंजूर चिंतेत

Patil_p
error: Content is protected !!