Tarun Bharat

मीराबाई चानूला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण

Advertisements

संजिताला रौप्य, ओडिशाच्या स्नेहा सोरेनला कांस्य

वृत्तसंस्था/ गांधीनगर

ऑलिम्पिक रौप्यविजेती महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने अपेक्षेप्रमाणे 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पटकावले असून तिने महिलांच्या 49 किलो वजन गटात एकूण 191 किलो वजन उचलले.

गेल्या ऑगस्टमध्ये बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाईने सुवर्णपदक मिळविले होते. येथे तिने स्नॅचमध्ये 84 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 107 किलो वजन उचलले. तिने दुसऱयांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भाग घेतला असून डाव्या मनगटाला झालेली दुखापत पूर्ण झालेली नाही. त्यामुळे तिसरा प्रयत्न केला नसल्याचे तिने सांगितले. ‘पतियाळातील टेनिंगवेळी मला ही दुखापत झाली. त्यामुळे आणखी धोका न पत्करण्याचा निर्णय घेत तिसरा प्रयत्न केला नाही. वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा येत्या डिसेंबरमध्ये होणार असल्याने ही दक्षता घेतली,’ असे तिने सांगितले. ‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मणिपूरचे प्रतिनिधित्व करायला मिळणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. उद्घाटनाच्या सोहळय़ाला मला आघाडीवर राहण्यास सांगितल्यानंतर माझा आनंद द्विगुणित झाला. माझा इव्हेंट पुढच्या दिवशी लगेचच असल्याने अशा सोहळय़ानंतर थोडी घाई करावी लागते. पण यावेळी हे आव्हान स्वीकारण्याचा मी निर्णय घेतला,’ असेही ती म्हणाली.

मणिपूरच्या संजिता चानूने एकूण 187 (82 व 105) किलो वजन उचलत रौप्य व ओडिशाच्या स्नेहा सोरेनने 169 (73 व 96) किलो वजन उचलत कांस्यपदक मिळविले. संजिताने केरळमध्ये 2015 मध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण मिळविले होते.

Related Stories

ऑस्ट्रिया प्रथमच बाद फेरीत

Patil_p

बिग बॅश लीगमध्येही ‘डीआरएस’ची एन्ट्री

Amit Kulkarni

व्हेरेव्हला 40 हजार डॉलर्सचा दंड

Patil_p

लंका-पाक कसोटी मालिका बरोबरीत

Amit Kulkarni

सानिया मिर्झा-झेंग यांचे आव्हान समाप्त

Patil_p

ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतून भारतीय ज्युडो संघाची माघार

Patil_p
error: Content is protected !!