Tarun Bharat

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मीराबाई चानूला ‘रौप्य’

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

Mirabai Chanu won silver medal in World Championship कोलंबियातील बोगोटा येथे झालेल्या वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पयिनशिपमध्ये भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्य पदकाची कमाई केली. मनगटाच्या दुखापतीशी झुंज देत असतानाही मीराबाईने 87 किलो स्नॅच आणि 113 किलो क्लीन ऍन्ड जर्क असे एकूण 200 किलो वजन उचलले.

मीराबाईचे वर्ल्ड चॅम्पयिनशिपमधील हे दुसरे पदक आहे. यापूर्वी तिने 2017 मध्ये 194 किलो (85 किलो स्नॅच आणि 109 किलो क्लीन अँड जर्क) वजन उचलून सुवर्णपदक जिंकले होते. आताची स्पर्धा मीराबाईसाठी सोपी नव्हती. काही दिवसांपासून ती मनगटाच्या दुखापतीशी झुंजत होती. त्यामुळे ती खेळापासून दूर होती. मात्र, तीने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले.

अधिक वाचा : कर्जाचा हप्ता वाढला! RBI कडून रेपो रेटमध्ये 35 बेसिस पॉईंटची वाढ

या स्पर्धेत चीनच्या जियांग हुइहुआने 206 किलो एकत्रित वजनासह सुवर्णपदकावर मोहर उमटवली. तर टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन होऊ झिहुईने 198 किलो (89 किलो आणि 109 किलो) वजन उचलून कांस्यपदक जिंकले.

Related Stories

भुजबळांच्या नावे पुन्हा धमकीचे फोन

Archana Banage

महिलेच्या विनयभंग प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

Abhijeet Khandekar

महिलांच्या टेनिस स्पर्धांमध्ये वाढ

Patil_p

हिमाचल प्रदेश : खाजगी कंपन्यांनाही कोरोना टेस्ट करण्यास परवानगी

Tousif Mujawar

मुख्यमंत्री ठाकरेंनी मेहुण्याच्या कंपनीसोबतचे संबंध जाहीर करावे

datta jadhav

Rajyasabha Election; पी. चिदंबरम आणि इतर पाच जण तामिळनाडूतून राज्यसभेवर बिनविरोध येण्याची शक्यता

Abhijeet Khandekar