Tarun Bharat

मिरजेत झाडाची फांदी अंगावर पडून तरुण जागीच ठार

Advertisements

मिरज / प्रतिनिधी

मिरज मेडीकल कॉलेजच्या क्रीडांगण येथे कंपाऊंड भिंतींवर बसून मोबाईलवर बोलत असताना अंगावर झाडाची फांदी पडल्याने यश उर्फ हर्षवर्धन बाळासाहेब कदम (वय 23, रा. माळी गल्ली न्यू इंग्लिश शाळे जवळ, मिरज) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडाची फांदी बाजूला काढून यशाच्या मृतदेह बाहेर काढला. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

यश कदम हा मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मिरज मेडीकल कॉलेजच्या ग्राऊंडवर कंपाऊंड भींतीवर बसला होता. त्याच्या पाठीमागेच वडाचे झाड होते. सायंकाळी चार वाजल्यानंतर वादळी वारे सुटले होते. यावेळी झाडाची मोठी फांदी तुटून यश याच्या अंगावर पडली. त्यात त्याचा जागीच मृत्यु झाला.

Related Stories

कुंडल येथील महाराष्ट्र कुस्ती मैदान पावसामुळे रद्द

Abhijeet Shinde

कोयना धरण १०० टक्के भरले

Abhijeet Shinde

डी. वाय. पाटील साखर कारखान्याची निवडणूक चौथ्यांदा बिनविरोध

Sumit Tambekar

श्रेयस अय्यरवर लागली सर्वाधिक बोली, 12.25 कोटींना…

datta jadhav

शिवाजी विद्यापीठाची परीक्षा रद्द झाल्याचे पत्र सोशल मिडियावर व्हायरल; आता सायबर सेल तपास करणार

Archana Banage

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 10 लाखांपार

datta jadhav
error: Content is protected !!