Tarun Bharat

झटपट श्रीमंतीचं भूत डोक्यात शिरलं! उसाच्या शेतात घेतलं गांजाचं पिक अन्…

शिपुर येथे गांजाची शेती, लाखो रुपयाचा गांजा जप्त; उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

मिरज : शेती परवडत नाही म्हणून झटपट श्रीमंतीच्या हव्यासापोटी शेतकरी गांजा या पिकाकडे वळताना दिसत आहे. गांजाची लागण करताना कमालीची गोपनीयता बाळगली जाते. मिरज तालुक्‍यात अनेक गावांमध्ये ऊस, द्राक्षे आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. यातच मिरज तालुक्यातील शिपुर गावामधील एका पट्ट्याने चक्क उसामध्ये गांजा लागवड केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शिपुर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून गांजा जप्त केल्यानंतर तालुक्‍यातील गांजाची चोरी शेती पुन्हा चर्चेत आली आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी की, शिपुर-खंडेराजुरी रोड येथील पोटकॅनॉल जवळील शेतीमध्ये नंदकुमार दिनकर बाबर या पट्ट्याने चक्क तीस गुंठ्यांत झाडांची गांजा पिकाची लागवड केल्याची माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाने पथकासह बाबर यांच्या शेतात धाड टाकली आहे.

यावेळी उसाच्या शेतात ठराविक अंतरावर जवळपास अंदाजे ४०० ते ५०० गांजाची रोपे ३–४ फूट वाढलेली आढळून आलेली आहेत. ही सर्व रोपे जप्त करण्यात आली आहेत. पुढील अधिक तपास ए. एस. कोळी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. या पथकासह शिपूर गावचे पोलीस पाटील तसेच मिरज ग्रामीण पोलीस यांनी ही सहभाग घेतला आहे.

Related Stories

सांगली जिल्ह्यात नवे 1575 कोरोना रूग्ण, 41 जणांचा मृत्यू

Archana Banage

सांगली जिल्ह्यात ‘या’ सेवा घरपोच सुरू राहणार

Archana Banage

कृष्णा नदीमध्ये सोडले मळी मिश्रीत पाणी

Archana Banage

तर आरक्षण उठविण्याचा प्रस्ताव महासभेत फेटाळणार

Archana Banage

सांगलीतील तरूणाचा कोरोना वॉर्डमध्ये मृत्यू

Archana Banage

भिमगीतातून डॉ. आंबेडकरांना सलाम

Abhijeet Khandekar