Tarun Bharat

१० हजाराची लाच घेताना मिरजगीचा तलाठी गणेश कदम एसीबीच्या जाळ्यात

Advertisements

प्रतिनिधी/अक्कलकोट

शेतीच्या सातबारा उताऱ्यावरील नाव कमी करून खरेदीदारचे नाव लावण्यासाठी दहा हजाराची लाच घेणाऱ्या तलाठ्याला सोमवारी दि. २९ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. गणेश हणमंतराव कदम (वय ४८ पद तलाठी, मुळ नेमणूक सज्जा गरोळगी, अति, कार्यभार सज्जा- मिरजगी तहसिल कार्यालय, अक्कलकोट ता. अक्कलकोट जि. सोलापूर) असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

दरम्यान, तक्रारदार यांनी त्याच्या आईच्या नावे असलेली शेतजमीन विक्री केली असून सदर शेतीच्या सातबारा उताऱ्यावरुन तक्रारदार यांच्या आईचे नांव कमी करुन खरेदीदाराचे नाव लावून ७/१२ उतारा देण्याकरीता गणेश हनुमंतराव कदम यांनी तक्रारदार यांचेकडे १० हजार रुपये लाचेची मागणी करुन सदर लाच रक्कम ही तलाठी कार्यालय मिरजगी येथे स्वतः स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले. एसीबीकडून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे सूरज गुरव, ला.प्र.वि. पोलीस उपअधीक्षक सोलापूर संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमाकांत महाडिक, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर, पोलीस अंमलदार – पो.ह. शिरीषकुमार सोनवणे, पो. ना. घाडगे, पो.शि. सन्नके, आदींनी पार पाडली.

Related Stories

सोलापूर : माढा तालुक्यात ४८ जण कोरोना बाधित

Abhijeet Shinde

सोलापूर ग्रामीणमध्ये ४५४ कोरोनाबाधितांची भर

Abhijeet Shinde

लातूर : वेळेवर पगार होत नसल्याने वसतिगृह अधीक्षकाची आत्महत्या

Abhijeet Shinde

सोलापूर : एकाच वेळी तीन विद्युत रोहित्रातून ४६० लिटर ऑइल चोरी

Abhijeet Shinde

महाविकास आघाडीची सहा मते फुटली, शिवसेनेला कात्रजचा घाट, भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी

Rahul Gadkar

अक्कलकोटमध्ये साडे चार लाखाचा अवैध तांदूळ पकडला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!