Tarun Bharat

Sangli : मिरजेत तरुणाचा धारदार शस्त्राने खून

प्रतिनिधी/मिरज

शहरातील सांगलीकर मळा येथे तरुणाचा धारदार शस्त्राने खून झाला आहे. ऋषिकेश जाधव (वय 25, रा. घोरपडे वाडा, कमानवेस, मिरज) असे खून झालेल्या तरुणाचे नांवे आहे. अनैतिक संबंधातून सदरचा खून झाल्याचा संशय असून, खुन्यांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. मयत तरुणाच्या चेहऱ्यावर धारदार हत्यारांनी वार करुन चेहऱ्याचा चेंदामेंदा करण्यात आला असून, यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मिरज शहर पोलिसांना बुधवारी सकाळी एका दूरध्वनीवरुन सांगलीकर मळा येथे तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धांव घेऊन पंचनामा केला असता, तरुणाच्या चेहऱ्याचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटत नव्हती. पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करुन संबंधीत तरुणाच्या नातेवाईकांचा शोध घेतला. सदर तरुण हा सांगलीकर मळ्यापासून जवळच असलेल्या कमानवेस येथील घोरपडे वाडय़ात राहण्यास असल्याचे समजले. ऋषिकेश जाधव असे त्याचे नांव असल्याचे तपासातून स्पष्ट झाले. पोलिसांनी तरुणाच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयाकडे पाठविला आहे.

दरम्यान, अनैतिक संबंधातून सदर तरुणाचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्याअनुषंगाने खुन्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

सिरम : जुलै महिन्यापासून मुलांसाठी नोवाव्हॅक्स लशीची चाचणी सुरुवात होण्याची शक्यता

Tousif Mujawar

सांगली – मिरज रस्त्यावर 48 लाखांचा गुटखा जप्त

Abhijeet Khandekar

बोंबलून आशीर्वाद मिळत नाहीत, कामातून आशीर्वाद मिळतात; मुख्यमंत्र्यांचा राणेंना टोला

Archana Banage

‘तो’ विषय महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही

datta jadhav

केंद्र सरकारकडून 43 ॲप्सवर बंदी

datta jadhav

प्रेमसंबंध नाकारल्याच्या रागातूनच सायलीचा खून

Anuja Kudatarkar