Tarun Bharat

Ratnagiri News : बेपत्ता विवाहितेचा रत्नदुर्गच्या पायथ्याशी आढळला मृतदेह; घातपात की आत्महत्या चर्चेला उधाण

Advertisements

Ratnagiri Crime News: ऐन नवरात्रोत्सवात रत्नागिरी खालचा फगरवठार येथील बेपत्ता विवाहितेचा मृतदेह अडीचशे फूट खोल दरीत सापडला. सोमवारी सायंकाळी रत्नदुर्ग किल्ल्याच्या कपल पाँईट खाली हा मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे आत्महत्या की घातपात याबाबत परिसरात उलटसुटल चर्चांना उधाण आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्वी रितेश घाणेकर ( वय -३३ ऱा परटवणे खालचा फगरवठार रत्नागिरी) असे या महिलेच नाव आहे. तन्वी २९ सप्टेंबरच्या रात्री ७ च्या सुमारास घरातून आपली दुचाकी घेऊन घराबाहेर पडली. घरी येण्यास उशीर झाला तर जेवण करून घ्या असा निरोप तिने आपल्या मुलीला दिला. मात्र रात्री ती घरी परतली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंतही तन्वी हिचा थांगपत्ता न लागल्याने दुपारपर्यंत तिच्या कुटुंबियांनी आणि पती रितेश याने तन्वी ही बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली. यानुसार पोलीसांनी शोधकार्य सुरु केले.

या तपासादरम्यान पोलिसांनी शहर व आजूबाजूचा परिसर माहितीसाठी पिंजून काढला. दरम्यान ३० सप्टेंबर रोजी तन्वीची दुचाकी रत्नदुर्ग किल्ल्यावरील भगवती देवळाच्या समोर आढळून आली. तन्वीकडे असलेल्या मोबाईल चे लोकेशन ट्रक केले असता लोकेशन शहराबाहेरच्या परिसरात असल्याचे तपासात निष्पन्न झाल़े. दरम्यान, ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी रत्नदुर्ग किल्ल्यावरील कपल पॉईंटच्या खाली सुमारे २०० ते २५० फूट खोल दरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आल़ा. ही माहिती पोलीसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेह खोल दरीत समुद्राच्याकडेला असल्याने तो बाहेर काढणे अवघड होते. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्या महिलेचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. मृतदेहाविषयी खातरजाम करण्यात आल़ी त्यावेळी हा मृतदेह तन्वी घाणेकर हिचाच असल्याचे शिक्कामार्तब पोलिसांनी केल़. याविषयी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे पाठवण्यात आला आहे.

Related Stories

पेढांबेत धावला तालुक्यातील दुसरा टँकर

Patil_p

नैमित्तिक करारापेक्षा एसटी भाडे दुप्पट घेऊन वाहतूक का नाही?

NIKHIL_N

सरमळेत विजेसह नेट समस्येवर मात करीत कोरोना लसीकरण

Ganeshprasad Gogate

आचरा रामेश्वर संस्थांनकडून प्राथमिक आरोग्य केंद्रास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन सुपुर्द

Ganeshprasad Gogate

रत्नागिरी : पतीने केला पत्नीचा खून; राजापुरातील खळबळजनक घटना

Archana Banage

शेतकऱयांनी किसान विमा उतरवावा

Archana Banage
error: Content is protected !!