Tarun Bharat

मिशन 100% ‘विद्युतीकरण’..!

पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बेंगळुरू येथील कार्यक्रमात 100 टक्के विद्युतीकरण झालेल्या रोहा ( महाराष्ट्र ) ते ठोकूर ( कर्नाटक ) हा कोकण रेल्वे मार्ग तसेच इतर रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण केले. ‘मिशन 100% विद्युतीकरण – नेट झिरो कार्बन उत्सर्जनाकडे वाटचाल’ या मोहिमेअंतर्गत हे काम करण्यात आले आहे.

यावेळी रत्नागिरी, मडगाव आणि उड्डपी येथील इलेक्ट्रिक लोको ट्रेनला पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवला. त्याचबरोबर बयप्पनहल्ली येथील वातानुकूलीत रेल्वे स्थानक सर एम विश्वेश्वरय्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण केले.

Advertisements

कोकण रेल्वेचे आता 100% विद्युतीकरण करण्यात आले आहे. याचा देशाला फायदा होणार आहे. विद्युतीकरणामुळे एकंदर वार्षिक 150 कोटी रुपये इंधनावरील बचत होणार आहे.

➤ प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये –

⇨ एकूण मार्ग-740 किमी
⇨ महाराष्ट्र- 382 किमी, गोवा-106 किमी आणि कर्नाटक- 252 किमी
⇨ रेल्वेमार्ग लांबी- महाराष्ट्र- 970 किमी, गोवा- 163 किमी, कर्नाटक: 294 किमी
⇨ विद्युतीकरणासाठीचा एकूण खर्च: 1,287 कोटी रुपये

Related Stories

मेड इन इंडिया रेल्वे इंजिन तयार

datta jadhav

कर्नाटकात ‘ब्लॅक फंगस’वर होणार मोफत उपचारः आरोग्यमंत्री

Abhijeet Shinde

हिमाचल प्रदेश : बिलासपुरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Rohan_P

अडीच वर्षे झाली की शिवसेना भाजपसोबत येईल; आठवलेंचे भाकित

Abhijeet Shinde

ऑनलाईन सूर्यनमस्कार चॅलेंजला देशातून मोठा प्रतिसाद

Abhijeet Shinde

लॉकडाउन संपल्यावरच परीक्षा तारखांची घोषणा

Patil_p
error: Content is protected !!