Tarun Bharat

‘आज माझी मोहीम पूर्ण…’; संजय पांडेंच्या अटकेनंतर मोहित कंबोज यांचे ट्विट

ऑनलाईन टीम/तरुण भारत

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pande) यांना सक्तवसुली संचलनालयाने (ED) मंगळवारी दिल्लीत अटक केली. ईडीने नॅशनल स्टॉक एक्सचेंज(एनएसई) गैरव्यवहार व दूरध्वनी अभिवेक्षण प्रकरणात पांडे यांची अनेकवेळा चौकशी केली आहे. त्यांच्या कुटुंबियांशी संबंधीत १८ कोटी रुपयांच्या संशयीत व्यवहारांबाबत ईडीकडून तपास सुरू होता. दरम्यान संजय पांडेंच्या अटकेनंतर अटकेनंतर भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक सुचक ट्विट केले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) मंगळवारी अटक करण्यात आली आहे. संजय पांडेंच्या अटकेनंतर भाजपा नेते मोहित कंबोज यांनी एक सुचक ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटची सर्वत्र चर्चा रंगली आहे. (Mission Completed today BJP leader Mohit Kamboj tweet after Sanjay Pandey arrested)

संजय पांडे यांना ईडीने अटक केल्यानंतर “Mission Completed today”, असे ट्विट भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केले. या ट्विटसह त्यांनी याआधी केलेली अनेक ट्विट सुद्धा रिट्विट केली आहेत. काही महिन्यांपूर्वी मोहित कंबोज यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी कंबोज यांनी ही कारवाई सुडबुद्धीने झाली, असा आरोप केला होता. शिवाय, त्यावेळी कंबोज यांनी संजय पांडे यांना थेट आव्हान दिले होते.

हे ही वाचा : ओबीसी राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी युतीचं सरकार यावं लागलं, आता मविआ श्रेयाचं ढोल पिटवेल

Related Stories

मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेला शब्द मोडला

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या 72 तासांत कोरोनाचे 43 टक्के मृत्यू

Archana Banage

ठाकरेंना आणखी एक धक्का; उस्मानाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालचा प्रस्ताव नाकारला

datta jadhav

‘या’ योजनेतून होणार मोफत उपचार; शुल्क आकारल्यास 5 पट दंड : राजेश टोपे

Tousif Mujawar

हातकणंगलेतील चंदूरात एकाच दिवशी ९ पॉझिटिव्ह

Archana Banage

सोलापूर ग्रामीणची वाटचाल हजाराकडे

Archana Banage