Tarun Bharat

मिशेल-ब्लंडेलने न्यूझीलंडचा डाव सावरला

वृत्तसंस्था /हेडिंग्ले

यजमान इंग्लंडविरुद्ध तिसऱया व शेवटच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडची चहापानाअखेर 5 बाद 123 अशी पडझड झाली. त्यानंतर मिशेल व ब्लंडेल यांनी शतकी भागीदारी साकारत संघाला 5 बाद 225 धावांपर्यंत मजल मारुन दिली. त्यापूर्वी, जेमी ओव्हर्टनने डेव्हॉन कॉनव्हेला बाद करत कसोटी क्रिकेटमधील आपला पहिला बळी नोंदवला. हेन्री निकोल्स व डॅरेल मिशेल यांनी 21 षटके खेळून काढत जेमतेम 40 धावांची भागीदारी केली.

Advertisements

दुहेरी धावसंख्या गाठण्यासाठी तब्बल 71 चेंडू घेणाऱया निकोल्सला सत्रातील शेवटच्या षटकात आश्चर्यकारकरित्या बाद होत परतावे लागले. लीचला स्ट्रेट ड्राईव्हचा महत्त्वाकांक्षी फटका लगावल्यानंतर चेंडू नॉन स्ट्रायकर एण्डवरील मिशेलच्या बॅटवर आदळला आणि मिडऑफवरील लीजने सोपा झेल टिपला. मिशेलने यावेळी आपली बॅट बाजूला घेण्याचे पूर्ण प्रयत्न केले. पण, यात त्याला यश मिळाले नाही. चेंडू त्याच्या बॅटवर आदळल्यानंतर थेट लीजच्या हातात जाऊन विसावला. निकोल्स पाचव्या गडय़ाच्या रुपाने बाद झाला, त्यावेळी न्यूझीलंडने 123 धावांपर्यंत मजल मारली होती. याचवेळी चहापानासाठी खेळ थांबवण्यात आला होता.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड पहिला डाव : 90 षटकात 5 बाद 225 (विल्यम्सन 31, कॉनव्हे 26, मिशेल नाबाद 78, ब्लंडेल नाबाद 45, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड प्रत्येकी 2 बळी, ओव्हर्टन 1 बळी).

Related Stories

पाक-ऑस्ट्रेलिया वनडे मालिका लाहोरमध्ये

Amit Kulkarni

धावपटू मिल्खा सिंग पुन्हा आयसीयूमध्ये दाखल

Patil_p

जोकोविच, एम्मा, मारिया, व्हेरेव्ह उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

मिराबाई चानूला उत्तर प्रदेश सरकारतर्फे 1.5 कोटी प्रदान

Patil_p

विराट, डीव्हिलियर्स आरसीबी संघात दाखल

Amit Kulkarni

भारताचे मालिकाविजयाचे बुलंद इरादे

Amit Kulkarni
error: Content is protected !!