Tarun Bharat

मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात? मुलगा मिमोहने सांगितले कारण

Advertisements

तरुणभारत ऑनलाइन टीम


ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती गेल्या अनेक दशकांपासून लोकप्रिय आहेत. त्यांचा डान्स ,स्टाईल आणि त्यांनी साकारलेली भुमिका यामुळे त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. नुकतेच ते ‘द काश्मीर फाईल्स’ या गाजलेल्या चित्रपटात दिसले होते.तर सध्या ते एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहेत.पण मिथुन चक्रवर्तीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये ते हॉस्पिटलच्या बेडवर दिसत आहेत.

माजी खासदार आणि भाजपचे राष्ट्रीय सचिव डॉ. अनुपम हाजरा यांनी ३० एप्रिल रोजी शेअर केलेला त्यांचा फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे.फोटोसोबत “लवकर बरे व्हा मिथुन दा”.असं त्यांनी कॅप्शन दिल आहे. यावर मिथुन चक्रवर्तीचा मुलगा मिमोह याने खुलासा केला की अभिनेत्याचा व्हायरल झालेला फोटो सध्याचा फोटो आहे.मिथुन चक्रवर्ती यांना पोटदुखी, ताप आणि तत्सम लक्षणांची तक्रार झाल्यानंतर त्यांना कर्नाटकातील बेंगळुरू येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 71 वर्षीय अभिनेत्याला आता डिस्चार्ज मिळाला आहे.आणि आता ते तंदुरुस्त आणि ठीक आहे.

Related Stories

शनाया कपूरकडून चित्रिकरणास प्रारंभ

Patil_p

‘ती’ ड्रग्ज पार्टी नव्हती : करण जोहर

Rohan_P

टॉम क्रूजसोबत दिसणार प्रभास

Patil_p

‘गन्स अँड गुलाब्स’मध्ये राजकुमार राव

Amit Kulkarni

‘द रेल्वे मेन’ या मेगाबजेट वेबसीरिजची घोषणा

Amit Kulkarni

ऑनलाईन नाटक हे भविष्य आहे : अजित परब

Patil_p
error: Content is protected !!