Tarun Bharat

पाच राज्यांमधील पोटनिवडणुकांमध्ये संमिश्र परिणाम

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

गुजरात आणि हिमाचल प्रदेश येथील विधानसभा निवडणुकांसमवेतच बिहारमधील एक, छत्तीसगडमधील एक, ओडीशातील एक आणि राजस्थानातील एक अशा चार विधानसभा पोटनिवडणुकांचीही मतगणना गुरुवारी झाली आहे.  उत्तर प्रदेशातील एक विधानसभा आणि एक लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची मतगणनाही झाली असून संमिश्र परिणाम दिसून आले आहेत. पाच राज्यांमधील सहा विधानसभा पोटनिवडणुकांपैकी भाजपने 2, काँगेसने 2, बिजदने 1 तर सपने 1 जागा जिंकली. उत्तर प्रदेशातील मैनपुरी लोकसभा जागा सप नेते अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यांनी जिंकली आहे.

विधानसभा पोटनिवडणुका

बिहारच्या कुरहानी विधानसभा मतदानसंघात भाजपचे केदार प्रसाद गुप्ता यांनी संयुक्त जनता दलाचे मनोज कुमार सिंग यांचा 3,500 हून अधिक मतांनी पराभव केला. ही जागा भाजपने संयुक्त जनता दलाकडून खेचली

छत्तीसगडच्या भानूप्रतापपूर मतदारसंघात काँगेसच्या सावित्री मांडवी यांनी भाजपचे ब्रम्हदत्त नेताम यांचा 21 हजार पेक्षा अधिक मतांनी पराभव केला.

ओडीशाच्या पद्मपूर मतदारसंघात बिजू जनता दलाच्या वर्षासिंग बरीहा यांनी भाजपचे प्रदीप पुरोहित यांचा 42 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.

राजस्थानातील सरदारशहर मतदारसंघात काँगेसचे अनिल शर्मा यांनी भाजपचे अशोक कुमार यांचा 25 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.

उत्तर प्रदेशातील खतौली मतदारसंघात राष्ट्रीय लोकदलाचे उमेदवार मदन भय्या यांनी भाजपच्या राजकुमारी यांचा 24 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.

उत्तर प्रदेशातील रामपूर मतदारसंघात भाजपचे आकाश सक्सेना यांनी समाजवादी पक्षाचे मोहम्मद अमीर राजा यांचा 34 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. भाजपने प्रथमच ही हा मतदारसंघ जिंकला आहे.

लोकसभा पोटनिवडणूक

उत्तर प्रदेशाच्या मैनपुरी मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांनी भाजपचे राजगुरुसिंग शाक्य यांचा 3 लाख 88 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. समाजवादी पक्षाने ही जागा स्वतःकडे कायम राखली आहे.

Related Stories

गरिबांसाठी 65 हजार कोटींची गरज : रघुराम राजन

Tousif Mujawar

वडिलांविरोधात करणार नाही प्रचार : भाजप खासदार

Patil_p

सुभाषचंद्र बोस जयंतीला राष्ट्रीय सुटी घोषित करा

Omkar B

प्रेमासाठी काय पण…..

Patil_p

अनाथ बालकांचे पालनकर्त्ते बना!

Patil_p

जम्मूतील इस्लामी विद्वानाचे कोरोनाने निधन

Amit Kulkarni