प्रतिनिधी /पणजी
आमदार अपात्रता याचिकेवर सुनावणी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नकार दर्शविल्याने काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांची सदर याचिका आता विशेष खंडपीठासमोर येणार असून त्यावर शुक्रवार दि. 10 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
चोडणकर यांनी सभापती रमेश तवडकर यांच्यासमोर 8 फेब्रुवारी आमदारांविरोधात सादर केलेली अपात्रता याचिका निकालाविना प्रलंबित असून त्यावर निकाल मर्यादित वेळेत कायद्यान सार देण्यात यावा असे निर्देश सभापतींना द्यावेत म्हणून चोडणकर यांनी उच्च न्यायालयामध्ये दरवाजे ठोठावून गोवा खंडपीठात याचिका सादर केली होती.
सदर याचिका सोमवारी सुनावणीस आली तेव्हा न्या. महेश सोनक यांनी तिच्यावर सुनावणी न करता ती बाजूला काढून ठेवली. त्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही. परिणामी चोडणकर यांनी ती याचिका विशेष खंडपीठासमोर ठेवून सुनावणी करावी अशी मागणी केली असून ती मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे सदर याचिकेवर आता विशेष खंडपीठ सुनावणी करणार असल्याचे सांगण्यात आले.
न्या. सोनक हे यापूर्वी गोवा खंडपीठात वकील म्हणून कार्यरत होते. काँग्रेसचे आमदार फ्gढटण्यापूर्वी काही आमदारांचे वकील म्हणून त्यांनी त्यांच्या विविध याचिकांवर काम केलेले होते. याकारणास्तव त्यांनी चोडणकर यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दर्शवल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता ती सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा विशेष खंडपीठासमोर घेतली जाणार आहे.