वार्ताहर /केपे
केपे तालुक्मयातील बाळ्ळी व शिर्ली-बार्शे पचायतीत झालेल्या पोट निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे आमदार एल्टन डिकॉस्ता याचे दोन्ही पंच सदस्य निवडून आले आहेत . बार्शे पचायतीच्या प्रभाग सात मध्ये सर्वानंद वेळीप यानी 34 मताची आघाडी मिळवत विजय सपादन केले तर बाळ्ळी येथील हर्षद परिट यांनी 19 मतानी विजय मिळवला . बार्शे पंचायतीत 9 पैकी चार काँग्रेसचे पच सदस्य असून पंचायतीत काँग्रेसचे संख्खा बळ वाढले आहे. बाळ्ळी पंचायतीत काँग्रेसच्या ताब्यात असून 9 पैका r6 काँग्रेसचे आहेत. बार्शे पंचायत प्रभाग सात मध्ये सर्वानंद वेळीप व दिनेश वेळीप याच्यात सरळ लढत झाली होती यात दिनेश याला 196 तर सर्वानंद याला 230 मते पडली. मागच्या निवडणूकीत सर्वानंद वेळीप हे एक मताने पराभूत झाले होते. मात्र, या पोट निवडणुकीत 34 मताची आघाडी घेत विजय संपादन केला. तर बाळ्ळीत माजी जिल्हा पंचायत सदस्य व माजी सरपंच रोहिदास नाईक यांना 99 तर हर्षद परिट यांना 118 मते मिळवून ते 19 मतांनी विजयी झाले. आपण पाठिंबा दिलेले दोन्ही उमेदवार विजयी झाल्याने आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी जनतेचे आभार मानले आहेत. आम्हाला गावचा विकास हवाय त्याकरता जनतेने आम्ही ठेवलेले उमेदवार निवडू? आणले आहेत. गावच्या विकासाला प्राध्यान देऊ असे एल्टन डिकास्टा यांनी सांगितले.