MLA Nitesh Rane will break the coconut of the buying and selling union’s election campaign
सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघ पंचवार्षिक निवडणुकीत भाजप व बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदे गट अशी नवी युती झाली आहे 14 उमेदवार रिंगणात आहेत यात चौदा उमेदवारांच्या युतीचा प्रचाराचा शुभारंभ गुरुवारी 3 नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता सावंतवाडी संस्थांच्या राजवाड्यातील श्री देव पाटेकर देवस्थान मंदिर येथे श्री फळ ठेवून आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे राज्यात भाजप शिंदे गट असे नवे सरकार स्थापन झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली सहकार विभागा ची निवडणूक होत आहे त्यात सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक होत असून त्यामध्ये राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले त्यानंतर प्रथमच भाजप आणि शिंदे गट अशी नवी युती या निवडणुकीत झाली आहे आणि या नव्या युतीच्या प्रचाराचा शुभारंभ युतीच्या प्रमुख मंत्री यांच्या उपस्थितीत होणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे आज सायंकाळी सावंतवाडीत येत आहेत त्यामुळे तेही या युतीच्या उमेदवारांची चर्चा करणार आहेत आणि त्यांची भेट घेणार आहेत त्यामुळे भाजप शिंदे गट युती ने या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत प्रचार जोमाने सुरू केला आहे.
सावंतवाडी/ प्रतिनिधी