Tarun Bharat

आमदार प्रेमेंद्र शेट यांची बेळगाव एपीएमसीला भेट

Advertisements

भाजीपाल्याची पाहणी करून व्यापाऱयांशी केली चर्चा :  बेळगावच्या चवदार बटाटय़ाबद्दल काढले गौरवोद्गार

प्रतिनिधी /बेळगाव

डिचोली (गोवा) मये मतदारसंघाचे आमदार व गोवा फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रेमेंद्र विष्णू शेट यांनी बेळगाव एपीएमसीला रविवारी भेट दिली. गोव्याला भाजी पुरवठा करणाऱया दुकानांतून त्यांनी भाजीपाल्यांची पाहणी केली.

आमदार प्रेमेंद शेट यांची नुकतीच गोवा फलोत्पादन महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव एपीएमसीला भेट देऊन गोव्याला भाजी पुरवठा करणाऱया भाजीपाल्याची माहिती घेतली. यावेळी त्यांनी विविध दुकानांना प्रत्यक्ष भेट देऊन बेळगावच्या चवदार बटाटय़ाबद्ल गौरवोद्गार काढले. यावेळी ओली मिरची, काकडी, गाजर, भेंडी, ढबू, वांगी, कारली, कांदे व बटाटय़ाची पाहणी केली. शिवाय गोव्याला भाजीपाला पुरवठा करणाऱया व्यापाऱयांशी चर्चा केली. गोव्याला पुरवठा होणारा भाजीपाला उत्तम दर्जाचा आणि ताजा असावा, यासाठी आमदार शेट यांनी भेट दिली असल्याचे सांगितले.

बेळगाव येथून मोठय़ा प्रमाणात गोव्याला भाजीपाल्याचा पुरवठा केला जातो.  गोवा फलोत्पादन महामंडळाच्या माध्यमातून तो ग्राहकांपर्यंत पुरविला जातो. गोवेकरांना उत्तम दर्जाचा आणि ताजा भाजीपाला मिळावा या हेतूने आम्ही अचानक बेळगाव एपीएमसीला भेट दिली असल्याचे आमदार शेट यांनी सांगितले.

Related Stories

कदंब सेवा बनतेय बेभरवशाची

Amit Kulkarni

चित्रशाळांमध्ये गणेशमूर्तीच्या कामांची लगबग

Omkar B

कोळंब – काणकोण किनारी भागात 77 कुटिरे, 6 उपाहारगृहे हटविली

Patil_p

सांखळीत आज पाच दिवसीय गणेशमूर्तींचे विसर्जन

Amit Kulkarni

भांगराळे गोंयच्या उत्सवी नाटय़ स्पर्धेत ‘आगळे त, वेगळे हाव’ नाटक प्रथम

Amit Kulkarni

राज्य निवडणूक आयुक्तपदास नारायण नवती यांचा नकार

Amit Kulkarni
error: Content is protected !!