पुणे / प्रतिनिधी :
MLA Rohit Pawar as President of Maharashtra Cricket Association महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आली आहे.
पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर पार पडलेल्या कमिटीच्या बैठकीत त्यांची निवड करण्यात आली आहे. रोहित पवार यांच्यासोबतच उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी शुभेंद्र भांडारकर, खजिनदारपदी सांगलीचे संजय बजाज आणि सहसचिव म्हणून संतोष बोबडे यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा क्लब गटाकडून विजय झाला. असोसिएशनच्या बैठकीत सर्वप्रथम रोहित पवार यांना एमसीएच्या 16 सदस्यीय समितीत घेतले गेले आणि नंतर असोसिएशनचे अध्यक्षपदही सोपवण्यात आले. दरम्यान, एमसीए अध्यक्षपदी निवड झालेले रोहित पवार हे शरद पवार यांच्यानंतरचे कुटुंबातील दुसरे सदस्य आहेत.
संधीचे सोने करू : रोहित पवार
या निवडीनंतर बोलताना रोहित पवार म्हणाले, क्रिकेट नेहमीच माझ्या आवडीचा खेळ राहिला आहे. एमसीएच्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंसाठी काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. सर्वांना सोबत घेऊन खेळाडूंना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहणार असून, या संधीचे आपण सोने करू.