Tarun Bharat

आमदार सामंत यांच्या मंत्रीपदाने समर्थकांनी केला जल्लोष

Advertisements

रत्नागिरीत एकमेकांना पेढा भरवून आनंद केला व्यक्त

प्रतिनिधी/ रत्नागिरी

राज्य मंत्रिमंडळात रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांनी पॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेताच रत्नागिरीत समर्थकांनी जल्लोष साजरा केल़ा सामंत यांच्या शहरातील जयस्तंभ येथील कार्यालयासमोर समर्थक सकाळपासूनच जमण्यास सुरूवात झाली होत़ी सामंत यांनी तिसऱयांदा मंत्रीपदाची शपथ घेताच फटाक्यांच्या आवाजाने परिसर दणाणून सोडल़ा तसेच एकमेकांना पेढा भरवून आनंद व्यक्त केल़ा

मुंबईतील राजभवनमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंगळवारी 18 आमदारांना पॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिल़ी यात 11 व्या नंबरला रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी शपथ घेतल़ी दरबार हॉलमध्ये झालेल्या या शपथविधीला सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत हे देखील उपस्थित असल्याचे पहावयास मिळाल़े तर आमदार सामंत याचे वडील अण्णा सामंत व आई स्वरूपा सामंत यांनी पाली येथील निवासस्थानी दूरचित्रवाणीच्या माध्यमातून शपथविधी पाहिल़ा

राज्यात झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे शिंदे गटात सहभागी झाले होत़े ठाकरे सरकारमध्ये सामंत यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विभागाचे मंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होत़ी शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर सामंत यांना मंत्रीपद मिळणार, अशी शक्यता सुरूवातीपासूनच वर्तवण्यात येत होत़ी अपेक्षेनुसार मंत्रिमंडळाच्या पहिल्याच विस्तारामध्ये सामंत याचे नाव पहावयास मिळाल़े यामुळे कार्यकर्ते व सामंत समर्थकांमध्ये उत्साहाची लाट पसरल़ी

रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे 2004 पासून सलग 4 वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत़ यापूर्वी 2013 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात सामंत यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली होत़ी त्यांच्याकडे नगरविकास, वने, बंदरे, खारजमीन, क्रीडा व युवक कल्याण, माजी सैनिक कल्याण, विधी व न्याय मत्स्य व्यवसाय आदी खात्यांची जबाबदारी देण्यात आली होत़ी तर 2019 च्या उद्धव ठाकरे सरकारमध्ये सामंत यांच्यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आल़ी

आता उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात तिसऱयांदा मंत्रीपदाची तर दुसऱयांदा पॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आह़े जिह्याच्या व रत्नागिरी तालुक्याच्या शिवसेनेत 2 गट पडल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आह़े त्यात सामंत यांच्या मंत्रीपदाने समर्थकांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. सामंत यांना आता कोणत्या खात्याची जबाबदारी मिळते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आह़े आमदार सामंत यांच्या मंत्रीपदाचा जल्लोष साजरा करण्यासाठी शहरातील जयस्तंभ येथील कार्यालयासमोर महेश ऊर्फ बाबू म्हाप, सुहेल मुकादम, राजन शेटय़े, निमेश नायर, बिपीन बंदरकर, रोशन फाळके, विकास पाटील आदींचा समावेश होत़ा  

           मंत्रीपदाचा आंनद, मात्र राजकारणाची भीती वाटते

उदय सामंत यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा आम्हा कुटुंबियांना अतिशय आनंद झाला आह़े असे असले तरी चार दिवसापूर्वी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे आता मला राजकारणाची भीती वाटू लागली आह़े जनतेचे प्रेम समोर ठेवून आमदारांनी जिह्याचा विकास करावा.

                         स्वरूपा सामंत (मातोश्री, मंत्री उदय सामंत)

           मंत्रीपदाच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा करावी

खउदय सामंत यांच्या मंत्रीपदामुळे घरात आनंदाचे वातावरण आह़े त्यांच्या राजकीय निर्णयावर मी कोणतेही भाष्य करणार नाह़ी मंत्रीपदाचा वापर त्यांनी गोरगरिबांच्या सेवेसाठी कराव़ा त्यांच्या यशामध्ये माझ्यापेक्षा मोठा भाऊ किरण याचे मोठे पाठबळ आह़े

                          – अण्णा सामंत (वडील, मंत्री उदय सामंत)

जिह्याच्या विकासाला हातभार लागावा

आमदार उदय सामंत यांच्याशी असलेले आपले संबंध हे राजकारणापलिकडील आहेत़ मंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल आपल्याकडून त्यांना शुभेच्छा आहेत़ सामंत हे आमदार म्हणून नेतृत्व करत असल्याने मंत्रीपदाच्या माध्यमातून जिल्हय़ाच्या विकासाला हातभार लागावा.

                                    – प्रदीप उर्फ बंडय़ा साळवी

Related Stories

हरित लवाद निर्णयाविरोधात जांभा व्यावसायिक सर्वोच्च न्यायालयात

Patil_p

रत्नागिरी : ठोक निधीसाठी राजापूर नगरपरिषदेत आंदोलन

Abhijeet Shinde

सावंतवाडीत रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन

NIKHIL_N

रत्नागिरी तालुका काँग्रेस बैठकीत अंतर्गंत वाद उसळले

Omkar B

तुळस येथे 9 जानेवारीला वकृत्व स्पर्धा

NIKHIL_N

जिल्हय़ात 610 नवे कोरोनाबाधित

Patil_p
error: Content is protected !!