Tarun Bharat

आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात

ऑनलाईन टीम / मुंबई :

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात झाला. एसटी बसने जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारला समोरून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. जगताप या अपघातातून थोडक्यात बचावले. पहाटे साडेपाचच्या सुमारास रासायनीनजिक हा अपघात झाला. (mla sangram jagtap bmw car accident on mumbai-pune expressway)

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, संग्राम जगताप आज पहाटे मुंबईकडे निघाले होते. दरम्यान, 5.30 वाजण्याच्या सुमारास रासायनीजवळ एसटी बस आणि जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात जगताप यांच्या कारचा चक्काचूर झाला. सुदैवाने जगताप यांच्या कारमधील कोणालाही इजा झाली नाही. आमदार जगताप मुंबईत सुखरुप पोहचले आहेत.

Related Stories

नागासोबतचा जीवघेणा स्टंट पडला महागात

Abhijeet Shinde

कोल्हापूर : यावर्षीची राखी कोरोना योद्ध्यांसाठी

Abhijeet Shinde

ग्रामीण भारत कर्जबाजारी होतोय; 50 टक्क्यांहून अधिक कृषी कुटुंबांवर कर्जाचा बोजा

Abhijeet Shinde

नेर्ले येथे वाळूचा ट्रक पलटी, चालक जखमी

Abhijeet Shinde

देशाच्या इंचभर जमिनीवर कोणी वाकडी नजर टाकू शकत नाही

datta jadhav

संभाजीराजे शिवबंधन बांधायला उद्या दुपारी मातोश्रीवर या, उद्धव ठाकरेंचा निरोप

datta jadhav
error: Content is protected !!