Tarun Bharat

बंडखोर आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले, बडव्यांनी तुम्हाला घेरलं…

ऑनलाईन टीम/तरुण भारत

शिवसेनेसाठी आणि शिवसेनेचे डोळे उघडणारे पत्र आमदार संजय शिरसट (Sanjay Shirsat) यांनी मुख्यमंत्र्यांना लिहले आहे. अडीच वर्ष आमच्यासाठी वर्षाची दारं बंद होती. आमच्या जीवावर बडव्यांनी तुम्हाला घेरलं. आमदारांना अपमानास्पद वागणूक दिली. तुमच्यापर्यंत आम्हाला पोहचू दिलं नाही. अशावेळी एकनाथ शिंदे हे आम्हाला मदत करत होते. म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. असे पत्रात त्यांनी नमूद केलं आहे. काल मूळ प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी आमदारांना फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून भावनिक साध घातली होती त्याला हे उत्तर आहे. गेल्या अडीच वर्षांत नेमके काय झाले हे सांगण्याचा प्रयत्न या पत्रातून केला गेला आहे.

काय म्हणाले पत्रात शिरसट

पत्रास कारण की….काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दार गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच so called (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ने अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाच्या माळ्याचाही प्रश्न आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही.
मतदारसंघातील कामासाठी इतर प्रश्नांसाठी,वैयक्तिक अडचणीसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा. पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभ ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो.तीन ते चार लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षाशी आमदारांना अपमानास्पद वागणूक का? असा सवाल त्यांनी केला आहे ?

हेही वाचा-एकनाथ शिंदेंना भाजपची मोठी ऑफर? किती मंत्रिपद देणार?

”हीच सर्व हाल अपेक्षा आम्ही सर्व आमदारांनी सहन केली. आमची व्यथा, आपल्या आजूबाजूचे बडव्यांनी ऐकून घेण्याची कधी तसदीही घेतली नाही. किंबहुना आपल्यापर्यंत ती पोहोचलीसुद्धा जात नव्हती. मात्र याचवेळी आम्हाला एकनाथ शिंदे यांचा दरवाजा उघडा होता. मतदारसंघात असलेली वाईट परिस्थिती, मतदारसंघातील निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान, आमची सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते. त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही हा निर्णय घेण्यास घ्यायला लावला,” असं संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे.”

हेही वाचा-मुख्यमंत्री ठाकरे मंत्रालयातील सर्व सचिवांना संबोधित करणार

हिंदुत्व, अयोध्या, राममंदीर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना? मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं? तुम्ही स्वत: फोन करुन अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असं सांगितलं. मुंबई विमानतळावरुन अयोध्येला निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांचे लगेज चेक इन झाले होते. आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करुन सांगितलं, की आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही स्वत: परत घेऊन या. शिंदे साहेबांनी आम्हाला लगेच सांगितले की सीएम साहेबांचा फोन आला होता. आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका. आम्ही मुंबई विमानतळावर चेक इन केलेले लगेज परत घेतलं आणि आपलं घर गाठलं. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नव्हतं मग विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वसा का दाखवला? आम्हाला रामलल्लांचं दर्शन का घेऊ दिले नाही?,” अशी विचारणा संजय शिरसाट यांनी केली आहे.

हेही वाचा- शिवसेनेचा धनुष्यबाण मिळवण्यासाठी शिंदेंची कायदेशीर लढाई?

साहेब, जेव्हा आम्हाला वर्षावर प्रेवश मिळत नव्हता तेव्हा खरे विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमति भेटत होते. मतदरासंघातली काम करत होते. निधी मिळाल्याची पत्र नाचवत होते. भुमीपुजन आणि उद्घाटनं करत होते. तुमच्यासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत होते. त्यावेळी आमच्या मतदारसंघातले लोक विचारायचे की मुख्यमंत्री आपला आहे ना मग आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो? त्यांची काम कशी होतात? तुम्ही आम्हाला भेटतच नव्हता तर आम्ही मतदारांना उत्तर काय घ्यायचं या विचाराने जीव कासावीस व्हायचा अशी खंत संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे.

या सर्व कठीण प्रसंगात शिवसेनेचं, माननीय बाळासाहेबांचं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं हिंदूत्व जपणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मोलाची साथ दिली. आमच्या प्रत्येक कठीण प्रसंगात त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे होते. आजही आहेत आणि उद्याही राहतील या विश्वासापोटी आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत.काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते अत्यंत भावनिक होतं. पण त्यात आमच्या मुळ प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळाली नाहीत. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे भावनिक पत्र लिहावं लागलं, असं त्यांनी शेवटी म्हटलं आहे.

Advertisements

Related Stories

“मोठा भाऊ म्हणून जबाबदारी घ्या, भेदभाव न करता मदत द्या”

Abhijeet Shinde

अमेरिकेत 24 तासात 70 हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

राणा दाम्पत्याने ‘या’ कारणासाठी घेतली माघार

Abhijeet Shinde

DRDO कडून हायपरसॉनिक टेक्नॉलॉजीची यशस्वी चाचणी

datta jadhav

निर्णय होईपर्यंत वीजतोडणी थांबवणार : अजित पवार यांची घोषणा

Rohan_P

नाशिक पोलीस आयुक्त छत्रपती आहेत का?; फडणवीसांना आता पोलीस आयुक्तांकडून उत्तर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!