Tarun Bharat

वास्को शहरातील जलवाहिन्या तोडल्या प्रकरणी आमदार संकल्प आमोणकरांची पोलीस तक्रार

प्रतिनिधी /वास्को

वास्को शहरात गॅस वाहिनीसाठी रस्ता खोदताना जल वाहिन्या तोडून वास्को व मुरगावातील लोकांना अडचणीत टाकल्याप्रकरणी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी इंडियन ऑईल अदानी गॅस प्रायवेट लिमिटेड कंपनीविरूध्द पोलीस तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी त्वरीत एफआयआर नोंद करून जनतेच्या नुकसानीस जबाबदार ठरलेल्या अधिकाऱयांविरूध्द कारवाई करावी अशी मागणी आमदार आमोणकर यांनी केली आहे.

वास्कोत शहरात घालण्यात येणाऱया गॅस वाहिनीच्या कामाने यापूर्वी भूमीगत वीज वाहिन्या तोडून वीज पुरवठा 22 तास खंडीत केला होता. त्यानंतर पुन्ह जलवहिन्या तोडण्याचे कर्मही याच कंपनीच्या कामाने केलेले असून या कामामुळे वास्कोतील नागरीक त्रस्त बनलेले आहे. जलवाहिन्या तोडल्यामुळे मुरगावच्या लोकांनाही पाण पुरवठा झालेला नाही. गॅस वाहिनीच्या कामात कोणतीही सुरक्षा नाही, शिस्त नाही. कोणत्याही शासकीय संस्थांचा अधिकृत परवाना न घेताच रात्रीच्याच  वेळी रस्ते खोदण्याचे काम करण्यात येत असून दिवसा त्यांना जाब विचारण्यासाठीही ते सापडत नाहीत. या कंपनीच्या ठेकेदाराकडून मन मानेल तसे काम करण्यात येत आहे. त्यामुळेच जलवाहिन्या आणि वीज वाहिन्या तुटत आहेत. या कंपनीला कुणाचेही भय राहिलेले नाही. वीज खात्याने यापूर्वीच वीज वाहिन्या तोडल्याप्रकरणी त्यांच्याविरूध्द पोलीस तक्रार दिली होती. त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. सरकार आणि संबंधीत कंपनीचे लागेबांधे असल्यानेच लोकांना नुकसानीत टाकण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप आमदार आमोणकर यांनी केला.

आता असले प्रकार सहन केले जाणार नाही. या गॅस वाहिनीच्या कामावर आम्हीच नजर ठेवणार आहोत. वास्को पोलिसांनी आपण गॅस कंपनीविरूध्द केलेल्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करावी. वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी या प्रकरणी इंडियन ऑईल अदानी गॅस प्रा. लि. विरूध्द पोलीस तक्रार करावी व त्या कंपनीला आपण पाठीशी घालीत नसल्याचे दाखवून द्यावे अशी मागणी आमदार आमोणकर यांनी केली आहे.

Related Stories

शिवसेना यापुढे गोव्यातील सर्व निवडणुका लढवणार

Patil_p

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर पहिल्या गोवा भेटीवर

Patil_p

फोंडा तालुक्यात ऑनलाईन योग साधना

Amit Kulkarni

मृत्यूच्या थैमानाने राज्यात अस्वस्थता

Patil_p

हरमल येथे आज पावणेर तरंगोत्सव उत्सवाची सांगता

Amit Kulkarni

पर्यटकांना लूटप्रकरणी तिघा महिलांना अटक

Amit Kulkarni