Tarun Bharat

जनतेच्या समस्या सोडवणे नगरसेवकांचे कर्तव्य-शिवेंद्रराजे भोसले

आमदार शिवेंद्रराजे भोसले ; 50 हजार छत्री वाटपाचा केला शुभारंभ

सातारा: नगरसेवक हा नागरिकांचा सेवक असतो. प्रभाग, वॉर्डमधील समस्या सोडवून नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा पुरविणे आणि नागरिकांच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवणे हे प्रत्येक नगरसेवकाचे कर्तव्य आहे. कर्तव्य पार पाडण्यात नगरविकास आघाडीचे नगरसेवक नेहमीच कटीबद्ध राहिले आहेत, असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.

कोरोना, अतिवृष्टी असो किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो शिवेंद्रराजे आपत्तीग्रस्त, गरजू लोकांच्या मदतीसाठी नेहमीच अग्रेसर असतात. कोरोना काळात कोरोना केअर सेंटर उभारणीपासून, मोफत अन्नधान्य वाटप, रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून देणे आदींसाठी शिवेंद्रराजे नेहमीच तत्पर होते. आता सातारा-जावली मतदारसंघातील जनतेला पावसाळ्यात दिलासा मिळावा म्हणून यांच्यामार्फत 50 हजार छत्र्यांचे मोफत वाटप करण्यात येत आहे. शहरातील प्रभाग क्र. 15 मध्ये आज या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक अमोल मोहिते, आशा पंडित, भालचंद्र निकम, पिंटू जगदाळे, किशोर पंडित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शहरातील विविध भागामध्ये गोरगरीब आणि गरजू लोकांना छत्र्यांचे वाटप करण्यात येत आहे. सातारा आणि जावली तालुक्यातही छत्री वाटप सुरु झाले असून शिवेंद्रराजेंच्या मार्फत 50 हजार छत्र्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे अमोल मोहिते यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा- Satara Political:अभिनेते तेजपाल वाघ यांना लागलेत राजकीय डोहाळे


नगरविकास आघाडीने सातारकरांच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय दिला असून आघाडीचा प्रत्येक नगरसेवक नागरिकांचा सेवक म्हणूनच काम करत असतो, याचा मला अभिमान आहे. यापुढेही सातारकरांच्या समस्या सोडवण्यासाठी आघाडीतील प्रत्येक नगरसेवक अविरत कार्यरत राहील, असे आश्वासन . शिवेंद्रराजे यांनी दिले.

Related Stories

पालिकेच्या तीन शाळांचे भवितव्य अंधारात

Patil_p

स्व.पी. डी. पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Patil_p

सातारच्या गल्लीबोळातून अज्ञात आमदार फिरतोय

datta jadhav

माण बाजार समितीच्या 18 जागांसाठी 103 उमेदवारी अर्ज

datta jadhav

साताऱ्यात ६० नागरिकांना दिले डिस्चार्ज; ४९० नमुने पाठविले तपासणीला

Archana Banage

सातारा जिल्ह्यात ७० जण कोरोना बाधित

Archana Banage
error: Content is protected !!