Tarun Bharat

तुयेत आज आमदार उल्हास तुयेकर यांचा भव्य सत्कार

पेडणे  (प्रतिनिधी  )

नावेली मतदारसंघाचे भाजप आमदार उल्हास नाईक तुयेकर यांचा त्यांच्या मूळ पेडणे तालुक्मयातील तुये गावांत रविवार दि. 8 मे रोजी सायं. 4.30 वा. भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते तुयेकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तुये येथील श्री देवी भगवती मंदिर पटागंणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री देवी भगवती पंचायत संस्थान आणि तुये ग्रामस्थांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. उल्हास नाईक तुयेकर यांचे कुटुंब मूळ तुये गांवचे आहे. गोवा मुक्तीपूर्व त्यांचे कुटुंब व्यवसायानिमित्त मडगावात स्थलांतरित झाले. एका गावांतून दुसऱया ठिकाणी स्थलांतरित होऊन तिथे पंचसदस्य, सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य आणि आमदार बनण्याचा पराक्रम उल्हास नाईक तुयेकर यांनी करून दाखवला. आपल्या गांवच्या सुपुत्राने राजकीय क्षेत्रात मिळवलेल्या या यशाचा गुणगौरव करण्यासाठीच या सत्कार सोहळय़ाचे आयोजन केल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर नाईक तुयेकर यांनी दिली. सत्कार सोहळय़ाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मांदेचे आमदार जीत आरोलकर हे देखील हजर राहणार आहेत.

Related Stories

शिरोडय़ातील नक्षत्र स्पर्धेत कपिल बोरकर प्रथम

Amit Kulkarni

अंगणवाडी सेविकांचे दोन गट

Amit Kulkarni

सर्व योजना मागासवर्गीयांपर्यंत पोहोचविणार

Omkar B

दावकोण पूरग्रस्त भागात द. गोवा जिल्हाधिकाऱयाची पाहणी

Patil_p

पणजीतील दुसऱया टप्प्यातील पे पार्किंगसाठी सप्टेंबरमध्ये निविदा

Patil_p

राज्य सरकारला अधिवेशनात उघडे पाडू

Amit Kulkarni