प्रतिनिधी /मडगाव
लोकांना हवा तसा विकास ही संकल्पना डोळय़ांसमोर ठेवून गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सुरू केलेला आणि फातोर्डा मतदारसंघात प्रचंड लोकप्रिय झालेला ’संडे डायलॉग्स’ हा उपक्रम आता 26 जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे. सरदेसाई यांनी यापूर्वी या उपक्रमाच्या अंतर्गत सरकारी अधिकाऱयांना लोकांपर्यंत नेऊन लोकांशी त्यांच्या कामांविषयी थेट संवाद साधला होता. या संवादात लोक आपल्या अडचणी थेट अधिकाऱयांसमोर मांडत असत.
सरदेसाई यांनी सरकारी अधिकाऱयांना लिहिलेल्या पत्रात यापूर्वी अशा थेट संवादाद्वारे लोकांच्या समस्यांवर त्वरित तोडगे कसे निघत होते त्याची तुम्हाला जाणीव असून आता तोच उपक्रम परत सुरू करत असल्याचे म्हटले आहे. आपल्या या उपक्रमाला सरकारी अधिकाऱयांकडून चांगले सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. लोकांची कामे त्वरित व्हावीत यासाठी संबंधित अधिकाऱयांनी आपली रविवारची सकाळ लोकांबरोबर घालवून लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन सरदेसाई यांनी सरकारी अधिकाऱयांना केले आहे.