ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नाराज आहेत. ते रात्री-अपरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना भेटतात, असा गौप्यस्फोट बाळासाहेबांची शिवसेना गटाचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केला आहे. जाधव यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मीडियाशी संवाद साधताना प्रतापराव जाधव म्हणाले, उद्धव ठाकरेंसोबत असलेले आमदार आता अस्वस्थ आहेत. ते रात्री-अपरात्री सह्याद्रीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटतात. हे मी पाहिलं आहे. अनुभवलं आहे. एवढच नाही तर हे आमदार भाजपच्या नेत्यांनाही भेटतात. आमदारच नाही तर अनेक खासदारही त्यांच्या पक्षात नाराज आहेत.
अधिक वाचा : धनंजय चंद्रचूड देशाचे 50 वे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींनी दिली शपथ
महाविकास आघाडीतील इतर पक्षांचे आमदार खासदारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना रात्री भेटायला जातात. त्यांची अस्वस्थता किती दिवस टिकेल हे पाहावे लागेल, असेही जाधव म्हणाले.