Tarun Bharat

रुपाली ठोंबरेंची बदनामी करणारा ‘मनसे’ चा कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Thombre Patil) यांना सोशल मीडियावर (Social Media) अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्याला आज पोलिसांनी ताब्यात घेतले. समीर लाड (Sameer Lad) असं ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. लाड याला पुणे पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

सोशल मीडियावर अश्लिल भाषेत ट्रोल केल्याप्रकरणी रुपाली ठोंबरे यांनी फरासखाना पोलीस (Faraskhana Police Station) ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर मनसेच्या 16 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. तर आज मुंबईतून मनसेच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आले.

प्रकरण नेमकं काय?
रुपाली पाटील-ठोंबरे यांच्याविषयी मनसेच्या कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर बदनामीकारक मजकूर टाकल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता.यामध्ये त्यांनी फेसबुकवर “एक करोड ताईवर नाराज’ असा ग्रुप तयार करण्यात आला होता. त्यानुसार, त्या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी ऍड.गुंजाळ यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. ऍड.गुंजाळ यांनी त्याचा स्वीकार केल्यानंतर त्यांना संबंधित ग्रुपवरील मजकुरात रुपाली पाटील ठोंबरे यांचे छायाचित्र वापरून बदनामीकारक मजकूर टाकल्याचे आढळून आले. त्यानंतर ऍड.गुंजाळ यांनी महिलांविषयी बदनामीकारक मजकूर टाकू नका, असे तेथे लिहिले. दरम्यान, सुधीर लाड याने त्याच्या वैयक्तीक फेसबुक खात्यावरुन शिवीगाळ केल्याचा आॅडिओ समोर आला. यानंतर अॅड. गुंजाळ यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले.

Related Stories

सक्रिय रुग्णसंख्या 1.70 लाखांवर

datta jadhav

उपजिल्हाधिकारी धुमाळ, पांगारकर यांची बदली

Abhijeet Shinde

बहुउद्देशीय हॉलमध्ये आठवडय़ात कोविड सेंटर

Patil_p

घरी रहा, सुरक्षित रहा : सतेज पाटील

Abhijeet Shinde

मागील 24 तासात देशात कोरोनाचे 41,195 नवे बाधित; 490 मृत्यू

Rohan_P

…अन्यथा पोलीस चौकीसमोर हनुमान चालीसा लावू ; मनसेचा इशारा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!