Tarun Bharat

वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

१४ जूनला कोणालाही न भेटण्याचा घेतला निर्णय

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा १४ जुलै रोजी वाढदिवस आहे. दरवर्षी राज ठाकरेंना हजारो कार्यकर्ते भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी येत असतात. तसेच राज ठाकरेही त्यांना भेटून त्यांच्या शुभेच्छा स्वीकारतात. पण राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज मनसे कार्यकर्त्यांना एका ऑडिओ क्लिपच्या माध्यामातून एक कळकळीचे आवाहन केले आहे. राज ठाकरे यांनी ट्वीटरवर याबाबत एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांना १४ तारखेला वाढदिवसानिमीत्त मनसे कार्यकर्त्यांना भेटायला घरी येऊ नका, अशी विनंती केली आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या वाढदिवशी कार्यकर्त्यांनो १४ तारखेला भेटायला येऊ नये, जिथे आहात तिथून शुभेच्छा द्यावात, असं आवाहन राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मनसैनिकांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना केलं आहे.

ऑडियो पोस्टमधून काय केलंय आवाहन ?
माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो, त्यादिवशी पुण्याला जी सभा झाली आपली, त्या पुण्याच्या सभेत मी आपणाला सर्वांना सांगितलं की, माझी शस्त्रक्रिया करायची आहे. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झालो, त्यानंतर सगळ्या टेस्ट झाल्या आणि रात्री मला डॉक्टरांनी सांगितलं की, कोव्हिडचा डेड सेल आहे. ते काय असतं हे मलाही नाही माहिती आणि कोणालाच नाही माहिती असो. त्यामुळे माझी शस्त्रक्रिया रद्द झाली. आता परत करायचं, त्यानंतर मी एक १०-१२ दिवस कोव्हिडच्या नियमांप्रमाणे घरातच क्वॉरंटाईन आहे. त्या सगळ्या दरम्यान १४ तारखेला माझा वाढदिवस आहे. आपण सर्वजण दरवर्षी माझ्या वाढदिवसाला प्रेमाने आणि उत्साहाने माझ्याकडे भेटायला येता. मी सुद्धा आपल्या सर्वांची आतुरतेने वाट पाहतो. सर्वांना भेटल्यावर बरंही वाटतं, असं राज ठाकरे म्हणाले.

याआधी पुण्यात झालेल्या सभेत, राज ठाकरे यांनी त्यांच्या पायावरील शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली होती, मात्र कोरोना संसर्गामुळे त्यांची ती शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती, त्यानंकर राज ठाकरे यांनी हे आवाहन केले आहे. ते म्हणाले आहेत की, माझी एक शस्त्रक्रिया करायची आहे, त्यानंतर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तपासणीत कोविडचे डेड सेल आढळल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ते काय असतं हे मलाही आणि कोणालाच नाही माहिती नाही. त्यामुळे ती शस्त्रक्रिया रद्द झाली. त्यानंतर मी १०-१२ दिवस कोविडच्या नियमांप्रमाणे घरातच क्वॉरंटाईन आहे. त्या सगळ्या दरम्यान १४ तारखेला माझा वाढदिवस आहे. आपण सर्वजण दरवर्षी मा‍झ्या वाढदिवसाला प्रेमाने, उत्साहाने माझ्याकडे भेटायला येता. मीही आपल्या सर्वांची आतुरतेने वाट पाहातो. सर्वांना भेटल्यावर बरंही वाटतं, असे राज ठाकरे म्हणालेत.

Related Stories

इचलकरंजीतील संशयित वृद्धाचा मृत्यू

Abhijeet Shinde

देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त!

Rohan_P

कोल्हापूर : कोरोनाबाधित रुग्ण एक, अख्ख गाव लॉकडाऊन

Abhijeet Shinde

जिल्ह्यात रात्री उशिरा आणखी ४ पॉझिटिव्ह रुग्ण

Abhijeet Shinde

तेजस यादव, तेजप्रताप यादव यांच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल

Rohan_P

कंगना राणावतचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड

Abhijeet Shinde
error: Content is protected !!