ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यातील कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच यासंदर्भातली भूमिका स्पष्ट केली आहे.
यासंदर्भात माहिती देताना मनसे नेते बाबू वागस्कर म्हणाले, पुण्यातील मनसे नेत्यांची काल मुंबईत राज ठाकरे यांच्यासोबत कसबा पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. यात हिंदुत्व आणि विकास हे दोन्ही मुद्दे प्रभावशाली पद्धतीने पुढे नेणारी एकच घटक सध्या आहे, ती म्हणजे भाजप. त्यामुळे पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत मनसे भाजपसोबत असेल.
अधिक वाचा : धनंजय मुंडेंच्या नावाने मंत्रालयात बोगस भरती
कसबा विधानसभेच्या आ. मुक्ता टिळक यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. त्या जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे. भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर रिंगणात आहेत. रासने आणि धंगेकर यांच्यात ही लढत होणार असून, मनसेच्या पाठिंब्यामुळे रासने यांना बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.