Tarun Bharat

‘मतदान ओळखपत्र-आधार लिंक’साठी मोबाईल नाही अनिवार्य

निवडणूक विभागाचे स्पष्टीकरण
मोबाईल क्रमांकाच्या सक्तीबाबत तक्रारी
जिह्यात ‘मतदान ओळखपत्र-आधार’चे 61.11 टक्के लिंकिंग
19 लाख 25 हजार 246 मतदारांचे अर्ज जमाप्रवीण देसाई, कोल्हापूर
Kolhapur News: मतदान ओळखपत्राशी आधार कार्डचे लिंकिंग करण्याची मोहिम गेल्या दोन महिन्यांपासून सुरु आहे. आतापर्यंत जिह्यात 19 लाख 25 हजार 246 मतदारांचे मतदान ओळखपत्राशी आधार कार्डचे लिंकिंगचे काम पूर्ण झाले आहे. हे प्रमाण 61.11 टक्के इथके आहे. यासाठी मतदारांकडून मोबाईल क्रमांकाची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. परंतु याबाबत अशी कोणतीही सक्ती केली जात नाही, असे स्पष्टीकरण निवडणूक विभागाकडून देण्यात आले आहे.

या मोहिमेला 1 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. सोमवार (दि. 10) जिह्यात आतापर्यंत जिह्यात 19 लाख 25 हजार 246 मतदारांचे मतदान ओळखपत्राशी आधार कार्डचे लिंकिंगचे काम पूर्ण झाले आहे. हे प्रमाण 61.11 टक्के इतके आहे. या मोहिमेसाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून युध्द पातळीवर नियोजन सुरु आहे. मतदान ओळखपत्राशी आधार लिंकिंग करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडून घरोघरी जाऊन मतदारांकडून माहिती घेतली आत आहे.

यामध्ये मतदारांकडून मोबाईल क्रमांकही घेतला जात आहे. या क्रमांकावर निवडणूक आयोगाची सुचना पाठविणे, मतदार यादी अद्ययावती करणाबाबतच्या सुचना पाठविणे, मतदानाची तारीख कळविणे आदींसाठी मतदारांकडून मोबाईल क्रमांक घेतला जात आहे, असे स्पष्टीकरण निवडणूक विभागाकडून देण्यात येत आहे. परंतु ज्यांच्याकडे मोबाईलच नाही त्यांनी काय करायचे ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. वाडय़ा वस्त्यांसह डोंगर कपारीतील लोकांकडे अद्यापही मोबाईलची सुविधा नसल्याचे दिसत आहे. मग या मोबाईल क्रमांकाची सक्ती का ? अशी विचारणाही नागरिकांकडून होत आहे.

मतदान ओळखपत्र व आधार कार्ड लिंकिंगसाठी मोबाईल क्रमांक हा मतदारांना निवडणूक आयोगाची माहिती पाठविण्यासाठी घेतला जात आहे. त्यासाठी कोणतीही सक्ती नाही किंवा तो अनिवार्यही नाही. परंतु बहुतांश जणांकडे मोबाईल असून त्यांच्याकडून स्वेच्छेने मोबाईल क्रमांकाची माहिती दिली जात आहे.
-भगवान कांबळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, कोल्हापूर

जिह्यात 61.11 टक्के मतदान ओळखपत्र-आधार लिंकिंग
विधानसभा मतदारसंघ लिकिंग संख्या टक्केवारी
चंदगड – 258966 80.46
राधानगरी- 229945 69.29
कागल- 258872 78.76
कोल्हापूर दक्षिण – 132578 39.53
करवीर- 209662 67.02
कोल्हापूर उत्तर – 107062 37.28
शाहूवाडी- 201221 68.01
हातकणंगले- 202531 61.85
इचलकरंजी – 154347 51.83
शिरोळ – 170062 5.58
एकूण- 1925246 61.11

Related Stories

मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द …तरीही कर्नाटक प्रशासनाकडून खबरदारी !

Abhijeet Khandekar

कोल्हापूर जिल्हय़ात आज कोरोनाचे 51 बळी, 1 हजार 494 नवे रुग्ण

Archana Banage

कोल्हापूर : २५ हजाराची लाच घेताना इंगळी तलाठ्यास अटक; कोल्हापूर लाचलुचपत विभागाची कारवाई

Archana Banage

इचलकरंजीत अटक केलेला गुन्हेगार कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : दुग्धव्यवसाय धारकही आर्थिक अरिष्ट्यात

Archana Banage