प्रतिनिधी /म्हापसा
म्हापसा पोलिसांनी येथील कदंब बस स्थानकावर सादिक हुसेन वय 29 म्हापसा मुळ उत्तर प्रदेश यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे दीड लाख रुपये किंतीचे एकूण 6 भ्रमणध्वनी आढळून आले आहे. चौकशीअंती ते चोरीचे असल्याचे समजल्यावर पोलिसांनी संशयितास अटक केली.
सदर सहा मोबील एनरॉईडचे महागडे असून पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक दिगंबर कांबळी, हवालदार सुशांत चोपडेकर, एलआयबी टीम प्रकाश पोवळेकर, अभिषेक कासार, आनंद राठोड, अक्षय पाटील यांनी ही कारवाई केली.